मनोरंजन

Shriya Saran : दृश्यम फेम श्रियाचं बिकिनीत ‘बोट फोटोशूट’

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : साऊथसह बॉलीवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमठवणारी अभिनेत्री श्रिया सरन ( Shriya Saran ) सध्या गोव्यात सुट्यांचा मनमुराद आनंद लूटत आहे. मागील आठवड्यात श्रेयाने पिंक रंगाच्या बिकिनीतील काही फोटो शेअर केले होते. तर सध्या आणखी एका 'बोट फोटोशूट' ने सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.

अभिनेत्री श्रिया सरन ( Shriya Saran ) चित्रपटाच्या बिझी शेड्युलमधून वेळात- वेळ काढून आपल्या कुटूंबियासोबत गोव्यात सुट्यांचा आनंद घेत आहे. यावेळी तिच्यासोबत तिचा पती आंद्रेई कोस्चिव (Andrei Koscheev) आणि मुलगी राधा दिसतेय. श्रियाने नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर गोव्यातील काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी श्रियाने ब्लॅक रंगाची बिकिनी घालून एका बोटेत फोटोशूट केले आहे. श्रिया आणि पती आंद्रेई दोघेही समुद्रात किनाऱ्यावर मनमुराद आनंद घेताना दिसतायेत.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'हसणे आणि आनंदावर प्रेम करा, अटीशिवाय प्रेम करणे, हेतूशिवाय बोलणे, कारण नसताना देणे, अपेक्षेशिवाय काळजी घेणे, हीच खरी प्रेमाची भावना आहे. भगवानची गीता.' असे म्हटले आहे. शेअर केलेल्या एका फोटोत श्रिया एका बोटीत बसून हटके पोझ दिलीय. तर काही ठिकाणी समुद्राच्या पाण्यात राधासोबत मौज-मस्ती करताना दिसतेय. तर तिच्यासोबत पती देखील आनंदीत दिसत आहे. यातील एका फोटोत श्रियाच्या पाठीवर राधा बसलेली दिसतेय. मात्र, राधाचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. हे फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेन्टसचा पाऊस पाडला आहे. यात एका युजर्सने 'तू खूप सुंदर दिसतेस', 'तुम हुस्न परी, तुम जाने जहां, तुम सबसे हंसी, तुम सबसे जवान', 'जलपरी' , 'समुन्दर में नहा के और भी नमकीन हो गई हो….' असे म्हटले आहे तर दुसऱ्या एका युजर्सने 'Amazing loved it ??????❤️❤️', 'Cuteeee', 'Awesome', '??Uff', 'So hot, Cute and lovely ??❤️❤️', 'Beautiful and cute?❤️❤️','Gorgeous ???', 'Luvly?', 'Beautiful Pictures Shriya Garu ?❤️ !!', असे म्हटले आहे. तर काही नेटकऱ्यांनी खूप साऱ्या हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत.

याआधी श्रियाने पिंक रंगातील बिकिनीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत श्रिया खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत होती. यासोबत तिने एक व्हिडिओदेखील शेअर केला होता. श्रियाने बॉलिवूड अभिनेता अजय देवगनसोबतच्या दृश्यम चित्रपटातून वाहवा मिळवली. तसेच तिने अनेक दक्षिणात्य चित्रपट केले आहेत. त्यापैकी जय भीम फेम अभिनेता सूर्यासोबतचा तिचा एक चित्रपट गाजला.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT