मनोरंजन

बिग बॉस मराठी : तीन खास पाहुण्यांसोबत Ticket To Finale चा टास्क रंगणार

अनुराधा कोरवी

मुंबई; पुढारी ऑनलाईन: बिग बॉस मराठी घरातील कालच्या भागामध्ये मीनल Ticket To Finale च्या टास्कमधून बाहेर पडली. आता यासाठी उत्कर्ष, मीरा आणि विशाल तीन दावेदार आहेत.

बिग बॉस मराठी घरात उत्कर्ष, मीरा आणि विशाल या तिघांमध्ये कोणत्या सदस्याला Ticket To Finale मिळणार आणि कोण पोहोचणार अंतिम आठवड्यात हे पाहणे चाहत्यांसाठी मनोरंजक ठरणार आहे. घरात Ticket To Finaleचा टास्क काही खास पाहुण्यांसोबत रंगणार आहे. खास पाहुणे म्हणजे, घरात अमेय वाघ, वैदेही परशुरामी आणि ललित प्रभाकर जाणार आहेत.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सदस्यांना हे सरप्राईझ मिळाले आहे की Ticket To Finale चा टास्क पाहुण्यांच्या उपस्थितीत रंगणार आहे. यामुळे हा टास्क पाहताना चाहत्यांना मजा येणार आहे. तेव्हा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT