Bigg Boss Marathi मध्ये रितेश देशमुख होस्ट करणार  Pudhari
मनोरंजन

रितेश देशमुखची 'लयभारी बॉसगिरी', मराठी बिग बॉस लवकरच

'या' दिवशी Bigg Boss Marathi मध्ये रितेश देशमुखचा कल्ला

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : तंटा नाय तर घंटा नाय... रितेश भाऊचा हा डायलॉग आज महाराष्ट्रातील घराघरांत तोंडपाठ झालाय. रिअ‍ॅलिटी शोचा बाप असणाऱ्या 'बिग बॉस मराठी'चे आतापर्यंत चार प्रोमो आऊट झाले. या चारही प्रोमोमध्ये रितेश देशमुखची 'लयभारी बॉसगिरी' पाहायला मिळाली. आता एक नवीन, सॉलिड, जबरी प्रोमो 'बिग बॉस'प्रेमींच्या भेटीला आलाय. प्रोमो पाहून सारेच म्हणतायत,"आररर खतरनाक". तसेच 'बिग बॉस'च्या घराचं दार कधी उघडणार याची प्रतीक्षाही संपली आहे.

मराठी मनोरंजनाच्या 'BIGG BOSS Marathi'चा ग्रँड प्रीमिअर रविवारी २८ जुलैला रात्री ९ वाजता 'कलर्स मराठी'वर होणार आहे आणि त्यानंतरचे भाग रोज रात्री ९ वाजता प्रेक्षकांना पाहता येतील.

'बिग बॉस मराठी'च्या आतापर्यंत आलेल्या प्रोमोमध्ये रितेश देशमुखचा रुबाब पाहायला मिळाला. पण नव्या प्रोमोमध्ये रितेश भाऊ एका वेगळ्याच रांगड्या अंदाजात दिसतोय की राव... प्रोमोमध्ये एक आगळीवेगळी ऊर्जा अन् जोश आहे. प्रोमोनुसार, यंदा ढोल ताशाच्या गजरात सगळे स्पर्धक 'बिग बॉस'च्या चक्रव्यूव्हमध्ये शिरणार आहेत. जे चांगले वागणार त्यांची रितेश भाऊ वाहवाह करणार... पण जे वाईट वागणार त्यांची तो... एकंदरीत काय तर सगळ्यांची वाजणार अन् हा सीझन गाजणार.. कारण रितेश भाऊ म्हणतोय,"मी येणार तर कल्ला होणारच". आपल्या लाडक्या 'बिग बॉस' प्रेमींना नाराज न करता रितेश देशमुखने नव्या प्रोमोच्या माध्यमातून यंदाच्या सीझनची तारीखदेखील जाहीर केली आहे. या प्रोमोने सर्वत्र धुरळा उडवून दिलाय.

आला रे आला... 'बिग बॉस मराठी'चा धमाका!

मजा, मस्ती, ड्रामा अन् राडा असणारे बिग बॅास मराठीचे सुसज्ज आलिशान घर, १०० दिवस आणि अतरंगी स्पर्धकांचा सतरंगी प्रवास…फक्त १५ दिवसांत सुरू होणार आहे.

मराठी मनोरंजनाचा बाप... ज्याची वाट अख्खा महाराष्ट्र बघतो... सुरु व्हायच्या आधीच ज्याच्या बद्दलच्या चर्चेला उधाण येतं, असा आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम 'बिग बॉस मराठी' अवघ्या काही दिवसांत सुरू होत आहे. तारीख जाहीर झाल्याने यंदा कोणते स्पर्धक 'बिग बॉस मराठी'च्या घरात धूम करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ‘बिग बॉस मराठी'चं बिगुल आता वाजणार आणि स्पर्धकांच्या करामतींचा आता कस लागणार!! प्रत्येक आठवड्यात लागेल झटका, आणि रंगणार मनोरंजनाचा धमाका. अशक्य अशा गोष्टींनी बनलेला 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीसाठी आता सज्ज आहे. घरातील मजा, मस्ती, डाव , प्रतिडाव आणि नव्या होस्टची कमाल अशा साऱ्याच गोष्टी पाहण्याची , अनुभवण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT