निक्की तांबोळी 'या' सदस्यावर झाली फिदा झाली आहे Instagram
मनोरंजन

Bigg Boss Marathi Day 2 : घरात रोमँटिक वातावरण तयार झाले अन् निक्की..

निक्की तांबोळी 'या' सदस्यावर झाली फिदा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनची थाटात सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस मराठी'च्या घरात प्रेमाचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. 'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड प्रीमियरला निक्की तांबोळी रितेश भाऊसमोरच स्प्लिट्सविलाची जान असलेल्या अरबाज पटेलवर फिदा झालेली दिसून आली. आता दुसऱ्या दिवशी घनश्याम दरवडे निक्की आणि अरबाज यांना ग्रीन सिग्नल देताना दिसून येणार आहे.

'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या दिवसाचा प्रोमो समोर आला असून दुसऱ्याच दिवशी घरातील सदस्य रोमँटिक अंदाजात दिसून येत आहेत. प्रोमोमध्ये निक्की तांबोळी चहा बनवायला घेते. पण हीटर चालत नसल्याने तो घनशामला 'बिग बॉस'ला विनंती करण्यास सांगते. त्यावेळी घनशाम म्हणतो,"बिग बॉस' आमच्या वहिनींचं तरी ऐका...". त्यावर अरबाज त्याला म्हणतो,"थांबरे सकाळी सकाळी असं काय म्हणतो तू..".

पुढे घनशाम म्हणतो,"तुझं प्रेम उतू चाललंय ते सांगतोय.. चहा उतू गेला तर काही बिघडत नाही". घनशामच्या या वक्तव्यावर अरबाज आणि निक्कीला हसू अनावर होतं..अरबाज तर डोक्यालाच हात लावतो. त्यानंतरही घनशाम पुढे म्हणतो,"प्रेमात असचं असतंय 'बिग बॉस'. घनशाममुळे 'बिग बॉस मराठी'च्या घरात हास्य कल्लोळ होतो.

'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड प्रीमियरला निक्की तांबोळी अरबाजकडे पाहून लाजताना दिसली होती. अरबाजला पाहून सगळंच विसरली असल्याचं ती म्हणाली होती. रितेश भाऊलाही निक्की थोडं थोडं काहीतरी होऊ शकतं असं म्हणाली होती. तर दुसरीकडे अरबाजही, निक्कीला आता सगळीकडे मीच दिसेन, माझ्याशिवाय तिला दुसरं काही सुचणार नाही, असं म्हणाला होता". त्यामुळे आता 'बिग बॉस मराठी'च्या या सीझनमध्ये निक्की आणि अरबाजची जोडी जमणार का? याकडे 'बिग बॉस'प्रेमींचं लक्ष लागलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT