Bigg Boss Marathi 6 च्या घरात सोनाली राऊतच्या वागणुकीमुळे मोठा वाद निर्माण झाला असून रितेश भाऊंनी तिला कडव्या शब्दांत सुनावले आहे. ‘हा Attitude घरी ठेवायचा, या घरात नाही’ असे स्पष्ट सांगत रितेश भाऊंनी शिस्त आणि मर्यादांची आठवण करून दिली. या घटनेनंतर घरातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे.
Bigg Boss Marathi- 6 Sonali Raut Riteish Deshmukh
‘बिग बॉस मराठी ६’ लुरु झाल्यानंतर नव्या गेमने सर्वांनाच धक्का दिला आहे. या सिझनच्या पहिल्याच आठवड्यात रितेश भाऊने सर्वांचे मन जिंकलं आहे. पण, दुसरीकडे मात्र त्याचा राग पाहायला मिळत आहे. रितेश भाऊचा तोच कडक अंदाज, जबरदस्त स्वॅग, संवाद साधण्याची त्यांची खास शैलीमुळे बिग बॉसची चर्चा होऊ लागलीय.
या शोचा होस्ट रितेश देशमुख एकेकांची शाळा घेताना दिसतोय. प्रोमो रिलीज झाल्यापासूनच रितेश भाऊंच्या कडक डायलॉग्सनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. “मागचा सिझन वाजवलाय, यंदाचा गाजवायचाय... आहात ना तय्यार!” या त्यांच्या वाक्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली होती.
बिग बॉस मराठीच्या घरात १७ सदस्यांनी मोठ्या दिमाखात एन्ट्री घेतली, आणि संपूर्ण आठवडा प्रेक्षकांना राडा, भांडणं, मैत्री, याने खिळवून ठेवले. मात्र, यातीलच एक स्पर्ध सोनाली राऊतला मात्र रितेशचे कडवे बोल ऐकायला मिळत आहेत. अनुश्री माने असो वा सोनाली राऊत या सदस्यांना भाऊ त्यांची जागा दाखवणार आहे. कारण आहे. अनुश्री मानेची बिग बॉसच्या घरातील दादागिरी. तर सोनाली टास्क खेळण्यास नकार देते म्हणून रितेश भाऊ तिला इशारा ह देतो. तो घरातील एक सदस्य नॉमिनेट होणार असल्याचे सांगतो. त्यामुळे घरातील वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे.
सोनाली राऊतचा टास्क खेळण्यास नकार
या आठवड्यात 'शेणाचं दार अन् मेणाचं दार' हा कॅप्टन्सी उमेदवारीसाठी टास्क खेळण्यास सोनालीम नकार दिला. त्यामुळे बिग बॉसने तिला पुढच्या आठवड्यासाठी थेट नॉमिनेट केलं. या मुद्द्यावरून रितेश भाऊ सोनालीवर भडकतो. तिला रितेश भाऊचे कडवे बोल ऐकावे लागणार आहेत.
रितेश भाऊ सोनालीला देतो इशारा
रितेश भाऊ म्हणतो, "सोनाली तुम्ही ठरवलं, की त्या शेणाच्या दाराखाली तुम्ही नाही उभ्या राहणार... मग, तुम्ही आलात कशाला येथे? टास्क खेळायला आलात ना तुम्ही?"
सोनाली म्हणते - "मला जे वाटलं". तोपर्यंत रितेश भाऊ सोनालीला मध्येच थांबवतो. तो म्हणतो... "ओ एक मिनिट, हा ॲटीट्यूड तुमच्या घरी ठेवायचा. या घरात नाही, इथे सगळे सारखे आहेत. यावेळी नॉमिनेट केलंय, पुढच्या वेळेस घराच्या बाहेर काढेन."