बिग बॉस मराठी ६ मधील वादग्रस्त स्पर्धक सोनाली राऊट हिचा घरातील प्रवास संपल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. थेट बोलण्याचा स्वभाव, उद्धट उत्तरे आणि सततचे वाद यामुळे ती अनेकदा निशाण्यावर आली होती. प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांवरून आणि घरातील वातावरणावरून तिचा खेळ तिला महागात पडल्याचं दिसत आहे.
Bigg Boss Marathi-6 sonali raut
बिग बॉस मराठी सीझन ६ मधील स्पर्धक सोनाली राऊतने घरातून निरोप घेतलाय. बिग बॉस मराठी ६ चा प्रत्येक आठवडा हा नव्या वादांनी आणि नाट्याने भरलेला असतो. अशातच या आठवड्यात सर्वाधिक चर्चेत आलेलं नाव म्हणजे सोनाली राऊत. तिचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला आहे. तिचं नाव जाहीर होताच घरातील इतर स्पर्धक भावूक होत तिला निरोप दिला.
सोनाली राऊत ही सुरुवातीपासूनच तिच्या थेट बोलण्याच्या स्वभावामुळे चर्चेत होती. घरातील अनेक टास्कदरम्यान तिने सहस्पर्धकांना दिलेली उद्धट उत्तरं, टोमणे आणि आक्रमक भाषा आणि गेम खेळण्यास दिलेल्या नकारामुळे ती चर्चेत होती.
सेफ आणि एलिमिनेटमध्ये ओंकार सुरक्षित झाला तर सोनाली एलिमिनेट झाली. तुला मिस करणार, काळजी घे, तू स्ट्राँग आहेस असे म्हणत स्पर्धक भावूक झाले. सोनालीने आपल्या नावाची पाटी घेत मुख्य दारातून घराबाहेर आली. यावेळी सोनाली म्हणाली, एन्जॉय करा, मी तुमचा गेम पाहिन.
रितेश भाऊ म्हणतो, ''सोनाली तुमच्याकडे अनुभव होता, गेम देखील खेळण्याचा प्रयत्न चांगला केलात, कुठे कमी पडला?'' यावर सोनाली म्हणाली, ''माझ्या अपेक्षा जास्त होती. जे जे स्पर्धक पाहिले, ते वेगळे होते. मी त्यांच्याशी आणि ते माझ्याशी जुळवून घेऊ शकलो नाही. त्यामुळे तिथे कमी पडली असेल.''
बिग बॉसचे नियम न पाळल्याने सोनाली राऊतला नॉमिनेटदेखील व्हावं लागलं होतं. सोनालीने गेम खेळण्यासाठी नकार दिल्यानंतर रितेश भाऊ संतापला होता. तो म्हणाला की, 'हा ॲटिट्यूड तुमच्या घरात ठेवायचा. इथे नाही चालणार हा ॲटिट्यूड.यावेळेस नॉमिनेट केलंय, पुढच्या वेळेस घराबाहेर काढीन.'