Amruta Dhongade 
मनोरंजन

Amruta Dhongade : बिग बॉस मराठी 4 : अक्षय – अमृता धोंगडे मध्ये पुन्हा एकदा राडा !

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जेवण बनवण्यावरून, बाकीच्या ड्युटीजवरून (Amruta Dhongade) भांडणं होताना आपण बऱ्याचदा पाहिलं आहे. जेवण बनवताना किंवा डायनिंग टेबलवर जेवताना भांडू नका असे आपण खूपदा महेश सरांना सदस्यांना सांगताना ऐकले आहे. पण प्रत्येक सिझनमध्ये हे होताना आपल्याला दिसते. आजदेखील तसेच काहीसे होणार आहे. अक्षय आणि अमृता धोंगडेमध्ये जेवण बनवण्यावरून वादावादी होणार आहे. (Amruta Dhongade)

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये अक्षय अमृताला विचारताना दिसणार आहे. संध्याकाळी पोळ्या बनणार की नाही ? अमृताचं त्यावर म्हणणं पडलं, माझं अंग खूप दुखतं आहे मी नाही बनवणार. अक्षय म्हणाला, पण नाही बनवणार वैगरे असं नको ना. नाही जमणार असा पण टोन असतो.

अमृता म्हणाली, तुझा पण टोन तास होता. संध्याकाळच्या टीमने चहा टाका. आम्ही काही तुझ्या घरचे नोकर नाहीये इथं. अक्षय म्हणाला, आम्ही पण तुझ्या घरचे नोकर नाहीये… बोटं वैगरे नको दाखवूस. आता हा वाद अजून किती वाढला ? पुढे काय झालं? बघूया आजच्या भागात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT