Bigg Boss -19 latest updates Basir Ali angry
मुंबई – कलर्स वाहिनीवरील सर्वाधिक चर्चेत असणारा रिअॅलिटी शो बिग बॉस-१९ प्रेक्षकांसाठी दररोज नवनवीन ट्विस्ट घेऊन येतो. नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये प्रेक्षकांना धक्कादायक प्रसंग पाहायला मिळाला. घरातील सदस्य नीलमला अचानक चक्कर आली. ती कोसळल्याने काही क्षण घरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. इतर स्पर्धकांनी तिला तातडीने मदत केली.
याच दरम्यान बसीर अलीचा राग अनावर झाला. घरातल्या काही सदस्यांच्या वागणुकीमुळे तो चांगलाच संतापला. त्याचा आवाज उंचावला आणि त्यामुळे घरात वातावरण तापलं. नेहमी शांत दिसणाऱ्या बसीरचा हा अवतार पाहून बाकी सदस्यही चक्रावले.
परंतु एवढ्यावरच थांबत नाही. बिग बॉसच्या आदेशानंतर घरातलं संपूर्ण सामानच गायब झालं. स्पर्धकांना जेवण, वस्तू, कपडे काहीच न सापडल्याने घरात हाहाकार माजला. काही सदस्यांनी या टास्कमागील कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर काहीजण संतापून एकमेकांवरच राग काढू लागले.
बसीर अली, नीलम गिरी, अभिषेक बजाज भडकतात. घरातील सामान गायब होण्यामागे अमल मलिक - शहबाज बादशाह कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे. पण घरच्या सदस्यांना वाटतं की हे बिग बॉसचे कोणते तरी सीक्रेट टास्क आहे. पण सर्वांचा पारा तेव्हा हाय होतो, जेव्हा त्यांना समजते की, बिग बॉसने सामान गायब केलेलं नाही.
'बिग बॉस १९' च्या आगामी एपिसोडच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे की, बसीर अली कॅप्टन अमल मलिकला म्हणतो- त्याच्या साहित्याशी छेडछाड करण्यात आली आहे. संपूर्ण कंटेनर खाली आहे. यानंतर कुनिका सदानंद देखील म्हणते-सर्व मसाले गायब आहेत. चहापूड-साखर सर्व गायब आहे.
व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे की, सर्व सदस्य साहित्य जसे सोफा-काऊच अचलून साहित्य शोधत आहेत. पण गौरव खन्ना तर्क लावतो की, ११० टक्के हा सीक्रेट टास्क आहे. तेव्हा नीलम गिरीचा पारा हाय होतो आणि ती म्हणते की, मीठाविना तिला चक्कर येतेय. बसीर संतापतो आणि म्हणतो, त्याला त्याचे साहित्य वापस पाहिजे. अभिषेक बजाज म्हणतो- 'ज्याच्याकडे सामान सापडले, त्याला सोडणार नाही.'