Bigg Boss 19 Kunickaa Sadanand resigns captaincy
मुंबई - बिग बॉस १९ च्या घरात काही ना काही नेहमीच ट्विस्ट आलेलं दिसतं. सलमान खानच्या शोमध्ये सत्तापालट झालेले दिसते. घरात कुणीका सदानंद यांचे कॅप्टनसी पद गेलं आहे आता त्यांच्या जागी अशनूर कौऱला स्पेशल पॉवर मिळाल्याचे दिसते.
अमाल मलिक, आवेज दरबार, तान्या मित्तल, नतालिया जानोसजेक, नगमा मिराजकर, अभिषेक बजाज, बसीर अली, नेहल चुडासमा, गौरव खन्ना, अशनूर कौर, मृदुल तिवारी, फरहाना भट्ट, नीलम गिरी, प्रणित मोरे, जीशान कादरी, कुनिका सदानंद हे स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. पण पहिल्या आठवड्यात घरातून कुणाचे एलिमिनेशन झालेले नाही. पण आता दुसरीकडे, कुनिका सदानंदने आपल्या कॅप्टनसी पदाचा राजीनामा दिला आहे.
बिग बॉस १९ मध्ये कुनिका सदानंदने आपल्या कॅप्टनसी पदाचा राजीनामा दिल्यानंतर अशनूर कौर नवी कॅप्टन बनलीय. रिपोर्टनुसार, हा ड्रामॅटिक बदल तेव्हा समोर आला जेव्हा कुनीका सदानंद यांची जीशान कादरी, बसीर अली आणि अन्य स्पर्धकांसोबत घरातील काम आणि निर्णयांवरून तीव्र वादावादी पाहायला मिळाली. कुनिका सदानंद संतापल्या आणि जोरदार भांडणे झाली. कुनिकाने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत कॅप्टन पद सोडण्याची घोषणा केली.