मध्य प्रदेशातील भोपाळ येथून एक फसवणुकीची बातमी समोर येते आहे. टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध रिअलिटी शो बिग बॉसचे नाव घेऊन एका व्यक्तीची फसवणूक झाली आहे. बिग बॉसमध्ये प्रवेश मिळवून देतो म्हणून डॉक्टरांची 10 लाखांची फसवणूक केली आहे. एकदम फिल्मी पद्धतीने या शोमध्ये एंट्री देण्याची आमिष एका व्यक्तीने डॉक्टर अभिनीत गुप्ता यांना दाखवले होते. (Latest Entertainment News)
अभिनीत यांनी पोलिसांना सर्व घटना सांगितली त्यात ते म्हणतात, 2022 मध्ये करण सिंह भोपाळ ऑडीशनसाठी आले होते. तिथे त्यांनी मला विचारले, तुम्ही बिग बॉसमध्ये जाण्यासाठी का प्रयत्न करत नाही? ते पुढे म्हणाले बिग बॉसमध्ये माझी चांगली ओळख आहे. त्यामुळे तिथे बॅकडोअर एंट्री करून देऊ शकतात. पण यासाठी त्यांनी एक कोटी रुपये मागितले. मी सांगितले माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत. ते पुनः मुंबईला गेले.
तिथे त्यांनी माझी त्यांच्या सहकाऱ्यांशी फोनवर बोलणे करून दिले. त्यांनी मला 60 लाख रुपये देण्यास सांगितले. याशिवाय त्यांनी मला मुंबईला बोलावले. एंडेमोल कंपनीचे सीनियर वाईस प्रेसिडेंट हरिष शाह यांच्यासोबत माझी भेट घालून दिली. तिथे करण सिंह, सोनऊ कुंतल प्रियंका बॅनर्जी देखील होते. मी 10 लाख रुपये एंडेमोल कंपनीच्या अकाऊंटवर हे पैसे ट्रान्सफर करतो म्हणले पण त्यांनी मला कॅश देण्याची विनंती केली.
जेव्हा बिग बॉस 16 च्या स्पर्धकांची यादी जाहीर केली गेली त्यात माझे नाव नव्हते. जेव्हा करण सिंहला याबाबत विचारले असता त्याने सांगितले की वाइल्ड कार्ड एंट्री होणार आहे. पण हा शो असाच संपला.
त्यानंतर 17 व्या सीझनमध्ये मी पुन्हा करणला विचारले, त्यावेळी तो या सीझनमध्ये मला जाता येईल असे सांगितले. यावेळी शोच्या क्रिएटिव्ह डायरेक्टरची आणि माझी भेटही घालून दिली. पण त्याचाही फायदा झाला नाही. मी जेव्हा माझे पैसे परत मागितले हाती काहीच लागले नाही. पोलिस तक्रार करायला गेलो तेव्हा जवळपास 2 वर्षे तक्रार दाखल व्हायला.’
पोलिसांनी करण सिंह विरोधात कलमांतर्गत 420 फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.