Bhooth Bangla Teaser out instagram
मनोरंजन

Bhooth Bangla Teaser : भीतीचा डबल डोस अन्‌ हास्याचा फवारा...अक्षय कुमार-प्रियदर्शनच्या ‘भूत बंगला’चे टीझर पाहाच

Bhooth Bangla Teaser : भीतीचा डबल डोस अन्‌ हास्याचा फवारा...अक्षय कुमार-प्रियदर्शनच्या ‘भूत बंगला’चे टीझर पाहाच

स्वालिया न. शिकलगार

अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांच्या ‘भूत बंगला’ या आगामी चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. हॉरर आणि कॉमेडीचा अनोखा संगम असलेल्या या चित्रपटात अक्षय कुमारचा वेगळा अंदाज पाहायला मिळतो. टीझरमधील रहस्यमय बंगला आणि मजेशीर प्रसंग पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

akshay kumar Bhooth Bangla Teaser released

दिग्दर्शक-प्रियदर्शन आणि अभिनेता अक्षय कुमार यांची जोडी तब्बल १४ वर्षांनंतर भूतबंगला या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र दिसतेय. २०२६ मधील चर्चेत असलेला बालाजी मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘भूत बंगला’ चित्रपट आता चर्चेत आला आहे. या चित्रपटाचे टीझर रिलीज करण्यात आले आहे. त्या चित्रपटाचा भीतीदायक पोस्टर आधीच नजरेत भरणारा होता. निर्मात्यांनी ‘भूत बंगला’चा बहुप्रतीक्षित टीझर रिलीज केला आहे. हॉरर-कॉमेडी असलेला हा टीझरमध्ये मस्ती आणि मनोरंजनाने भरपूर असणारा आहे.

भीती आणि कॉमेडी यांचे मिश्रण असलेल्या या चित्रपटाची झलक टीझरमध्ये दिसते. रिलीज झालेल्या टीझरमध्ये एक रहस्यमय आणि जुनाट बंगला दाखवण्यात आला आहे. या बंगल्यात घडणाऱ्या विचित्र आणि थरारक घटनांमुळे वातावरणात भीतीची भावना निर्माण होते. मात्र त्याच वेळी काही मजेदार प्रसंगही दाखवण्यात आले आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांना भीतीसोबतच हसण्याचा अनुभवही मिळणार आहे. राजपाल यादव, परेल रावल, अक्षय कुमार, तबू, वामिका गब्बी यांच्या भूमिका लक्षवेधी ठरताहेत. टीझरमध्ये अक्षय कुमारचा वेगळाच अंदाज पाहायला मिळतो.

परेश रावल, असरानी आणि राजपाल यादव यांसारख्या दिग्गज कलाकारांची उपस्थिती. हे कलाकार लगेचच त्या जुन्या आठवणी परत आणतात. क्लासिक कॉमेडी म्हणता येईल असा हा चित्रपट असणार आहे. टीझरमध्ये दिसणारी छोटी जुन्या पात्रांची आठवण करून देणारी ठरते. दमदार संगीत, रोचक व्हिज्युअल्स, मजेदार पंचलाईन्स आणि अक्षय कुमार-प्रियदर्शन यांच्या चित्रपटांचा खास कॉमिक फ्लेवर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतताना दिसणार आहे.

बालाजी मोशन पिक्चर्सने केप ऑफ गुड फिल्म्ससोबत मिळून ‘भूत बंगला’ सादर केला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, वामिका गब्बी, परेश रावल, तब्बू आणि राजपाल यादव मुख्य भूमिकांमध्ये आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले असून, निर्माते अक्षय कुमार, शोभा कपूर आणि एकता आर. कपूर आहेत. हा चित्रपट १० एप्रिल, २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

अक्षय आणि दिग्दर्शक प्रियदर्शनने याआधी हेरा फेरी, गरम मसाला, भागम भाग, भूल भुलैया यासारखे चित्रपट केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT