भारती सिंहच्या घरी पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण आहे. दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर तिच्या आयुष्यात नवी सुरुवात झाली असून, बाळाच्या जन्माआधी तिने व्यक्त केलेली एक खास इच्छा पूर्ण झाली की नाही, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. सोशल मीडियावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Bharti Singh-Harsh Limbachiyya welcome Baby
भारती सिंहने गोलाच्या जन्मानंतर नेहमीच इच्छा व्यक्त केली होती की, तिच्या घरी लक्ष्मी यावी. आता तिने दुसऱ्यांदा बाळाला जन्म दिल्याचे वृत्त समोर आले आहे. हर्ष आणि भारतीने आपल्या बाळाचे स्वागत केले असून भारतची इच्छा पूर्ण झाली की नाही? अशी उत्सुकता फॅन्सना वाटत आहे.
भारतीने पहिला मुलगा गोलाच्या जन्मानंतर जवळपास ३ वर्षांनंतर दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. ही आनंदाची वार्ता जशी समोर आली आहे, तशी फॅन्सनी अभिनंदन करणे गरजेचे आहे.
भारती लाफ्टर शेफ्स सीजन ३ च्या सेटवर सकाळी शूटिंगसाठी जाणार होती. पण तिला अचानक वॉटर ब्रेक झाले आणि लेबर पेन सुरू झाले. तिला रुग्णालयात तत्काळ नेण्यात आले. तिथे तिने मुलाला जन्म दिला. भारती सिंहच्या पहिल्या मुलाचा जन्म ३ एप्रिल, २०२ २मध्ये झाले होते. गोलाच्या जन्मानंतर दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर जवळपास ३ वर्षांचे अंतर आहे.
भारतीने आपल्या दुसऱ्या प्रेग्नेंसीची अधिकृत घोषणा ६ ऑक्टोबर, २०२५ रोजी केली होती. तिने स्विट्जरलँडमध्ये आपल्या फॅमिली ट्रिपदरम्यान, बेबी बंप फ्लॉन्ट करत सुंदर फोटो शेअर करून माहिती दिली होती. अलिकडेच भारतीने बेबी शॉवर आणि मॅटरनिटी शूट देखील केलं होतं, ज्यामध्ये परिवार आणि जवळचे मित्रमंडळी सहभागी झाले होते.
भारती आणि हर्षची लव्ह स्टोरी
भारती आणि हर्ष लिम्बाचियाची पहिली भेट २००९ मध्ये टीव्ही शो कॉमेडी सर्कसच्या सेटवर झाली होती. त्यावेळी भारती शोमध्ये कंटेस्टेंट होती. तर हर्ष स्क्रिप्ट रायटर म्हणून काम करत होता. दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. हर्षने थेट लग्नाची मागणी घातली. जवळपास ८ वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी ३ डिसेंबर, २०१७ रोजी गोव्यात लग्न केले. २०२२ मध्ये गोलाचा जन्म झाली. पुढे दोघांनी मिळून अनेक टीव्ही शो होस्ट केले. ज्यामध्ये 'खतरा खतरा खतरा', 'हुनरबाज' आणि 'इंडियाज बेस्ट डांसर' समाविष्ट आहेत.