मनोरंजन

Phulrani : बालकवींची कविता फुलराणी चित्रपटात !

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क :
हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे,
त्या सुंदर मखमालीवरती फुलराणीही खेळत होती.

बालकवींची ही प्रसिद्ध कविता समस्त मराठी जनांच्या हृदयात कायमची कोरली गेली आहे. रसिकांच्या कितीतरी पिढ्या या 'फुलराणी'ने फुलवल्या. आगामी 'फुलराणी' या मराठी चित्रपटातून ही अजरामर कविता गीतरूपाने आपल्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक विश्वास जोशी यांनी ही 'फुलराणी' आपल्यासमोर आणली असून या 'फुलराणी' चा अनोखा अंदाज २२ मार्चला आपल्याला चित्रपटगृहात अनुभवायला मिळणार आहे. यातील 'विक्रम राजाध्यक्ष' ही भूमिका अभिनेता सुबोध तर कोळी आगरी ठसकेबाज 'शेवंता' अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हिने साकारली आहे.

संगीतकार निलेश मोहरीर यांनी या कवितेला अनोखा संगीतसाज दिला असून गायक हृषिकेश रानडे आणि गायिका वैशाली सामंत यांच्या स्वरांनी हे गीत सजलं आहे. गायक आणि गायिकेच्या अशा दोन्ही रूपात हे गीत ऐकता येणार आहे. 'फिनक्राफ्ट मिडिया' 'अमृता फिल्म्स' आणि 'थर्ड एस एंटरटेन्मेंट'ने 'फुलराणी… अविस्मरणीय प्रेम कहाणी' चित्रपटाची प्रस्तुती केली असून विश्वास जोशी, अमृता राव, श्वेता बापट चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. जाई जोशी, श्री.ए.राव, स्वानंद केळकर या चित्रपटाचे निर्माते आहेत.

या कलाकृतीचे लेखन विश्वास जोशी व गुरु ठाकूर यांनी केले आहे. गीते बालकवी, गुरु ठाकूर, मंदार चोळकर यांची असून संगीत निलेश मोहरीर आणि वरुण लिखाते यांचे आहे. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचं आहे. अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, प्रियंका बर्वे, हृषिकेश रानडे, आनंदी जोशी, शरयू दाते यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. छायांकन केदार गायकवाड तर संकलन गुरु पाटील आणि महेश किल्लेकर यांचे आहे. असोशिएट दिग्दर्शक उत्कर्ष शिंदे तर मुख्य सहाय्यक दिग्दर्शक संतोष वाडेकर आहेत. सायली सोमण यांची वेशभूषा असून रंगभूषा संतोष गायके यांची आहे. नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांचे आहे. कलादिग्दर्शन संतोष फुटाणे यांचे आहे.

२२ मार्चला 'फुलराणी' प्रदर्शित होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT