तृप्ती डिमरी-विकी कौशलच्या चित्रपटाची सर्वात मोठी ओपनिंग ठरली आहे Tripti Dimari Instagram
मनोरंजन

Bad Newz | तृप्ती डिमरी-विकी कौशलच्या चित्रपटाची सर्वात मोठी ओपनिंग, ८ कोटींचा गल्ला

'बॅड न्यूज'ची बॉक्स ऑफिसवर शानदार सुरुवात

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : विक्‍की कौशल, तृप्‍त‍ी डिमरी आणि एमी विर्कच्या 'बॅड न्यूज'ने बॉक्स ऑफिसवर शानदार सुरुवात केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केले आहे. पहिल्याच दिवशी ८ कोटींचा गल्ला जमवत विक्‍की कौशलच्या करिअरची आतापर्यंतचा सर्वात मोठी ओपनिंग ठरला आहे. (Bad Newz)

पहिल्याच दिवशी तिकीट खिडकीवरही प्रेक्षकांच्या रांगा लागल्याचे स्पष्ट झाले आहे. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे पहिल्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत प्रत्येक शोच्या प्रेक्षकांची संख्या सतत वाढत गेली. रात्रीच्या शोमध्ये, थिएटरमध्ये प्रेक्षक ३७% पेक्षा जास्त गर्दी दिसली.

अहवालानुसार, 'Bad Newwz' ने शुक्रवारी १९ जुलै रोजी पहिल्या दिवशी देशभरात ८.५० कोटी रुपयांचे निव्वळ कलेक्शन केले आहे. रिलीजपूर्वी या चित्रपटाने २.६७ कोटी रुपयांची आगाऊ बुकिंग केली होती.

अशी आहे 'बॅड न्यूज'ची कहाणी?

'बॅड न्यूज' हा रोमँटिक-कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा 'हेटेरोपॅटर्नल सुपरफेकंडेशन' वर आधारित आहे. यामध्ये एक स्त्री वेगवेगळ्या पुरुषांकडून जुळ्या मुलांना जन्म देते. म्हणजे जुळ्या मुलांना एक आई आणि दोन वडील आहेत. या चित्रपटाच्या वेगळ्या कहाणीमुळे आणि कलाकारांच्या चांगल्या कहाणीमुळे बॉक्स ऑफिसवर चित्रपट हपिल्या दिवशी धमाकेदार ठरला आहे.

वीकेंडमध्ये धुमाकूळ घालणार चित्रपट?

'बॅड न्‍यूज'च्या मजेशीर ट्रेलरमधूनच चित्रपटाच्या कहाणीचा अंदाज आला होता. या चित्रपटातील हिट गाण्यांचाही चित्रपटाला फायदा मिळेल. आता वीकेंडला किती दमदार कमाई होते, हे पाहणे, रंजक ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT