Avika Gor Engagement with boyfriend Milind  Instagram
मनोरंजन

Avika Gor Engagement | 'बालिका वधू'च्या 'आनंदी'ने केला साखरपुडा, फोटोज व्हायरल

Avika Gor Engagement with boyfriend | 'बालिका वधू'च्या 'आनंदी'ने लॉन्ग टाईम बॉयफ्रेंड सोबत साखरपुडा केला

स्वालिया न. शिकलगार

Avika Gor Engagement with longtime boyfriend

मुंबई : बालिका वधू या मालिकेतील बालकलाकार म्हणून प्रसिद्ध झालेली आनंदी उर्फ अविका गौरने साखरपुडा केला आहे. आपल्या लॉन्ग टाईम बॉयफ्रेंड मिलिंद चंदवानी सोबतचे तिने फोटो पोस्ट केले आहेत. साखरपुड्यानंतर इन्स्टाग्रामवर तिने फोटोज शेअर केले आहेत. फॅन्स तिचे अभिनंदन करत आहेत.

अविका - मिलिंद जवळपास चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होत. अनेकदा तिने सोशल मीडियावर एकमेकांप्रती प्रेम व्यक्त केलं आहे. फिल्मी अंदाजात अविकाने लग्नासाठी हो देखील म्हटलं होतं.

अविकाने इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचे दोन फोटो शेअर केले आहेत. ती बेबी पिंक कलर साडीत सुंदर दिसत होती. मिलिंद सेम कलर कुर्ता पायजमामध्ये दिसला. एका फोटोत दोघे एकमेकांचे हात धरलेले दिसत आहेत. अविकाने कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘त्याने विचारलं…मी हसले, मी रडले आणि माझ्या आयुष्यातील सर्वात सहज हो म्हणून ओरडले!’

‘मी ड्रामा करते आणि तो…’

अविकाने लिहिलंय, ‘मी पूर्णपणे फिल्मी आहे- बॅकग्राउंड स्कोर, स्लो-मो ड्रीम्स, काजळ लावणे आणि सर्व काही. दुसरीकडे तो लॉजिकल, शांत आणि गरजेसाठी फर्स्ट ॲड किट ठेवणारा. मी ड्रामा करते, तो मॅनेज करतो आणि बस याप्रमाणे आम्ही दोघे फिट झालो. या कारणाने जेव्हा त्याने मला विचारलं, तेव्हा माझ्या आतील हिरोईनने काम करणं सुरू केलं – हवेत हात, माझ्या डोळ्यात पाणी आणि माझ्या डोक्यात जीरो नेटवर्क कारण खरं प्रेम? हे सर्व नेहमी तंतोतंत योग्य असू शकत नाही. पण माझ्यासाठी हे मॅजिकल आहे.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT