

Vivek Agnihotri The Bengal Files Teaser released
मुंबई - आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि विचार प्रवर्तक सिनेमांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री आता घेऊन येत आहेत त्यांचा पुढील चित्रपट ‘द बंगाल फाईल्स: राईट टू लाईफ’. याआधी त्यांनी ‘द ताशकंद फाईल्स’ आणि ‘द काश्मीर फाईल्स’ सारखे वादग्रस्त पण वास्तववादी चित्रपट प्रेक्षकांसमोर आणले आहेत.
ही फिल्म पूर्वी 'द दिल्ली फाईल्स’ या नावाने ओळखली जात होती, पण आता तिचे नाव बदलून ‘द बंगाल फाईल्स’ ठेवण्यात आले आहे आणि आता जेव्हा या चित्रपटाचा अधिकृत टीझर प्रदर्शित झाला आहे, तेव्हा प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. टीझरमध्ये देशाच्या इतिहासातील एक भितीदायक बाजू पुन्हा एकदा समोर येतोय. प्रभावशाली व्हिज्युअल्स आणि भावना यांनी भरलेली ही झलक सांगून जाते की, हा चित्रपट अत्यंत परिणामकारक आणि अंतःकरणाला भिडणारा असणार आहे.
अभिषेक अग्रवाल आणि पल्लवी जोशी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार हे नावाजलेले कलाकार यात झळकणार आहेत. टीझरमध्ये दाखवलेले दृश्य प्रेक्षकांना अस्वस्थ करणारे आहेत, जे या कथानकाच्या खोलीची आणि वास्तवतेची झलक देतात.
काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या पहिल्या टीझरमध्ये मिथुन चक्रवर्ती एकट्याने एका ओसाड आणि अंधाऱ्या कॉरिडॉरमधून जाताना दिसतात. त्यांच्या थकलेल्या चेहऱ्यावर गंभीरता स्पष्ट दिसते आणि जळालेल्या आवाजात ते भारतीय संविधानाची प्रस्तावना वाचताना दिसतात – हे दृश्य प्रेक्षकांच्या मनात खोलवर परिणाम करून जाते.
‘द बंगाल फाईल्स’ या चित्रपटाची कथा विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलेली असून, याची निर्मिती अभिषेक अग्रवाल आणि पल्लवी जोशी यांनी केली आहे. हा चित्रपट आई एम बुद्धा प्रोडक्शन्स आणि तेज नारायण अग्रवाल यांच्या सादरीकरणात बनवण्यात आला आहे आणि ‘फाइल्स ट्रिलॉजी’ चा हा शेवटचा भाग असेल, ज्यामध्ये आधीचे ‘द ताशकंद फाईल्स’ आणि ‘द काश्मीर फाईल्स’ समाविष्ट आहेत. हा चित्रपट ५ सप्टेंबर २०२५ रोजी संपूर्ण भारतात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे