

Ram Charan film The India House Accident crew members injured
नवी दिल्ली - हैदराबादमधील साऊथ स्टारर राम चरणचा आगामी चित्रपट 'द इंडिया हाऊस'च्या सेटवर एक मोठी दुर्घटना घडलीय. सूत्रांनुसार, सेटवर पाण्याची टाकी फुटून पुरासारखे पाणी बाहेर पडले. सेटवरील सर्व साहित्य, वस्तूंचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत कोरिओग्राफरसह अन्य क्रू मेंबर्स जखमी झाले आहेत.
ही दुर्घटना एका ॲक्शन सीक्वेन्सच्या शूटिंगवेळी झाली. या सीनमध्ये पाण्याचा वापर होणार होता. यावेळी पाण्याची टाकी फुतून शूटिंग फ्लोरवर हजारों लीटर पाणी वाहून गेलं.
माहितीनुसार, जखमी क्रू मेंबर्सना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. पण, त्यावेळी राम चरण तिथे उपस्थित होता की नाही याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. सध्या चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे.
video- Telugu Scribe x account वरून साभार