payal malik evicted bigg boss ott 3
कृतिका-अरमान-पायल मलिक  Payal Malik Instagram
मनोरंजन

पायल मलिक BB OTT 3 बाहेर; नेटिझन्स म्हणाले..'आम्हाला काही पटलं नाही'

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : जिओ सिनेमावर स्ट्रीमिंग होत असलेला रिॲलिटी शो बिग बॉस ओटीटी ३ मध्ये नवी अपडेट आली आहे. बिग बॉसच्या घरात पहिले नॉमिनेशन झाल होते, ज्यामध्ये भारतीय बॉक्सर बेघर झाला होता. आता अरमान मलिकची पहिली पत्नी पायल मलिक देखील बेघर झाली आहे. पायल मलिक एलिमिनेट झाली आहे.

हे वृत्त शेअर करताना तिने लिहिलं, 'ब्रेकिंग न्यूज. सूत्रांच्या माहितीनुसार, पायल मलिक बिग बॉस ओटीटी ३ मधून एविक्ट झाली. आतापर्यंत ती चांगलं खेळत होती. परंतु, ज्यांना सर्वात कमी मते मिळतील, त्यांना जायलाचं हवं."

नेटिझन्सनी दिली प्रतिक्रिया

यानंतर लोकांनी यावर रिॲक्शन देणे सुरू केले. युजर्सचे म्हणणे आहे की, ही निर्मात्यांची चाल आहे. जर पायल निघून गेलीय तर लवकरच वाईल्ड कार्ड बोलावलं जाईल. यूट्यूबर अरमान मलिक आपल्या दोन्ही पत्नी कृतिका आणि पायल सोबत बिग बॉसच्या घरात आले होते.

या पोस्टवर कॉमेंट करत एका युजरने लिहिलं, 'लव्ह एविक्ट व्हायला हवं होतं' एका अन्य युजरने लिहिलं, 'मला वाटत आहे, ती वाईल्ड कार्ड घेऊन परत येईल.' आणखी एकाने लिहिलंय, 'हिचं नशीबचं खराब आहे. कृतिका नेहमी पुढे निघून जाते'. तिसऱ्या एका युजरने लिहिलं, 'अनफेयर एविक्शन'.

SCROLL FOR NEXT