rise and fall season 1 winner Arjun Bijlani
मुंबई - आरुष-अरबाजला मागे टाकत अभिनेता, होस्ट अर्जुन बिजलानीने 'राईज अँड फॉल'चे विजेतेपद जिंकले आहे. रिपोर्ट्सनुसार, ३० लाख मिळवून त्याने या सीझनचा पहिला मानकरी होण्याचा मान मिळवला. त्याचा सामना आरुष भोला शी झाला होता. त्याला मात देऊन अर्जुन विजेता बनला.
अर्जुन बिजलानीच्या या विजयामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी आनंदाचा वर्षाव केला आहे. ट्विटर, इन्स्टाग्रामवर “#ArjunBijlaniWinner” हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. अनेक चाहत्यांनी त्याच्या मेहनतीचं आणि सातत्याचं कौतुक केलं आहे.
‘राईज अँड फॉल’ हा रिअॅलिटी शो स्पर्धकांच्या भावनिक, शारीरिक आणि मानसिक क्षमतेची परीक्षा घेणारा शो आहे. या शोमध्ये प्रत्येक फेरीत स्पर्धकांना वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागला. अर्जुनने केवळ आपली विनोदबुद्धी आणि आत्मविश्वासामुळेच नव्हे, तर प्रत्येक टास्कमध्ये दाखवलेल्या शांत आणि प्रगल्भ वृत्तीमुळेही परीक्षकांची मने जिंकली.
होस्ट अशनीर ग्रोवरने अर्जुनला फिनाले एपिसोडमध्ये विजेता घोषित केला. अर्जुन बिजलानीच्या हातात ट्रॉफी घेतलेला फोटोज व्हायरल होत आहे. याशिवाय विजयाच्या मोमेंटचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शोच्या सेट बाहेर पडल्यानंतर अर्जुनने पॅपराजींसाठी फोटो पोज दिले. सोबतच सर्वांचे आभार देखील मानले.
फिनाले एपिसोडमध्ये अर्जुनने आपल्या परिवाराबद्दल आणि करिअरमधील संघर्षाबद्दल बोलताना भावनिक क्षण शेअर केले. “हा विजय माझ्या चाहत्यांचा आणि माझ्या परिवाराचा आहे,” असे अर्जुनने विजयानंतर सांगितले.
या शोच्या निर्मात्यांनी अर्जुनच्या प्रदर्शनाचे कौतुक करत सांगितले की, “तो नेहमी हसतमुख आणि सकारात्मक राहिला.
आरुष भोला शोमध्ये फर्स्ट रनर अप राहिला. तर अरबाज पटेल सेकेंड रनर अप ठरला. त्याच्याशिवाय, 'राईज अँड फॉल'च्या ट्रॉफीसाठी धनश्री वर्मा, नयनदीप रक्षित, आकृति नेगी देखील लढत होते. इंटरनल वोटिंगच्या आधारावर विजेत्याची निवड फिनालेमध्ये करण्यात आली. इथे सर्वाधिक मते अर्जुन बिजलानीला मिळाले.
अर्जुन बिजलानीने पापराझींच्या बातचीतमध्ये आपल्या विजयाचे श्रेय पत्नी नेहा स्वामीला दिले. तो म्हणाला, माझ्या विजयाचे श्रेय मी माझ्या पत्नीला देतो. तुम्हाला माहितीये का, मी काय करू इच्छितो.? मी घरी जाऊन माझ्या अंथरुणावर झोपू इच्छितो. मला माझ्या मुलाला देखील आलिंगन द्यायचं आहे.'