Dhurandhar Title Track | ओठात सिगारेट..लांब केस, रणवीर सिंहचा खतरनाक लूक; 'धुरंधर' टायटल ट्रॅक पाहाच!

Dhurandhar | ओठात सिगारेट..लांब केस, रणवीर सिंहचा खतरनाक लूक; 'धुरंधर' टायटल ट्रॅक पाहाच!
image of ranveer singh
Dhurandhar Title Track out Instagram
Published on
Updated on

Ranveer Singh action drama Dhurandhar title track

मुंबई - प्रत्येक चित्रपटात रणवीर सिंहची वेगळी भूमिका नेहमीच वेगली छाप सोडतो. रणवीर सिंह आपल्या हटके स्टाईलसाठी ओळखला जातो आणि यावेळी त्याचा आगामी चित्रपट धुरंधर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण त्यातील टायटल ट्रॅकमधील रणवीरचा खतरनाक लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

'धुरंधर' या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात रणवीर सिंहने साकारलेली भूमिका अतिशय गूढ आणि डॅशिंग असल्याचं टायटल ट्रॅक पाहून स्पष्ट होते. लांब केस, काळे कपडे, चेहऱ्यावर संतापाचे भाव आणि ओठात सिगारेट — हा लूक पाहून रणवीरच्या चाहत्यांना "रॅम्बो" आठवतोय! आदित्य धर दिग्दर्शित बहुप्रतीक्षित आगामी ॲक्शन चित्रपट 'धुरंधर'चे टायटल ट्रॅक रिलीज करण्यात आले आहे. 'ना दे दिल परदेसी नू' गाण्यातून रणवीरने आपल्या वेगळ्या अंदाजात सर्वांचेच लक्ष वेधलं आहे.

संजय दत्त, अक्षय खन्ना,अर्जुन रामपाल हे अभिनेतेही खतरनाक अंदाजात दिसले आहेत. या मल्टीस्टारर चित्रपटाची घोषणा काही महिन्यांपूर्वी झाली होती आणि आता त्याचा टायटल ट्रॅक प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.

या गाण्याचं विशेष म्हणजे, यात १९९५ मधील एक जुने पंजाबी लोकगीत “ना दे दिल परदेसी नू” (Na De Dil Pardesi Nu) वापरण्यात आलं आहे. याचं रीमिक्स व्हर्जन २००३ साली 'Panjabi MC' ने "Jogi" या नावाने प्रसिद्ध केलं होतं. आता, धुरंधर च्या टायटल ट्रॅकसाठी याच गाण्याला आधुनिक बीट्ससह नव्याने सजवलं आहे. 'ना दे दिल परदेसी नू' चे संगीत शाश्वत सचदेव आणि चरणजीत आहुजाने दिले आहे.

image of ranveer singh
SSKTK BO Collection : गेमच पालटला; कांताराने 'सनी संस्कारी'चे बारा वाजवले! आतापर्यंतचे कलेक्शन किती?

या दिवशी जारी होणार 'धुरंधर' ट्रेलर

निर्मात्यांनी २ मिनिट ३९ सेकंद टायटल ट्रॅक जारी केलं आहे. ट्रेलर १२ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात येईल. तर चित्रपट ५ डिसेंबर रोजी रिलीज होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news