‘आई कुठे काय करते’ मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अपूर्वा गोरे लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्यातील या महत्त्वाच्या टप्प्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण असून सोशल मीडियावरही तिच्या लग्नाबाबत कुतूहल व्यक्त केलं जात आहे.
Apurva Gore Wedding updates
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा गोरेने गुड न्यूज शेअर केलीय. तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या लग्नाची बातमी दिलीय. मराठी अभिनेत्री अपूर्वाने ती लग्नबंधनात अडकणार असल्याची गोड बातमी शेअर केलीय.
अपूर्वाने सोशल मीडियावर होणाऱ्या पतीसोबतचा खास फोटो शेअर केला आहे. तिने रत “चाफा आणि तो… मला खूप आवडतात ❤️ #ठरलं 🥰💍” असं कॅप्शन दिलं आहे.
पण तिचा पती फोटोमध्ये पाठमोरा उभा आहे. होणाऱ्या पतीचा चेहरा दिसत नाही. तिने पतीची ओळख उघड केलेली नाही. अपूर्वाच्या या पोस्टनंतर फॅन्सकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेकांनी तिचे अभिनंदन केले आहे.
अपूर्वाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती हिरव्या रंगाच्या साडीत दिसतेय. गळ्यात गोल्न हार, हातात लाल बांगड्या, मोकळे केस आणि चेहऱ्यावर हसू दिसतेय. तर तिचा पती रेड ब्राऊन रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसतो. त्याच्या हातात बेबी पिंक कलर गुलाबाचे फुल दिसते. तिच्या होणाऱ्या पतीने आपला चेहरा लपवलेला फोटोमध्ये दिसतो. या दोघांचे रोमँटिक अंदाजातील फोटो पाहायला मिळत आहेत.
अपूर्वाबद्दल थोडेसे...
अपूर्वाने २०१८ मध्ये सोनी वाहिनीवरील 'ती फुलराणी' या मराठी मालिकेत काम केले. २०२१ मध्ये स्टार प्रवाहवरील मराठी मालिका आई कुठे काय करते!मध्ये तिने अभिनय साकारला होता. ती या मालिकेत ईशाच्या भूमिकेतून लोकप्रिय झाली.