मनोरंजन

अंतिम: द फायनल ट्रूथमधील ‘भाई का बर्थडे’ गाणे लॉन्च

स्वालिया न. शिकलगार

अंतिम: द फायनल ट्रूथमधील 'भाई का बर्थडे' हे गाणे लॉन्च झाले आहे. निर्मात्यांनी जयपूरच्या राज मंदिर थिएटरमध्ये हे गाणे रिलीज केले. अंतिम चित्रपटातील गँगस्टर आयुष शर्मावर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. ज्या टोळीचा आयुष एक भाग आहे त्या म्होरक्याचा वाढदिवस आहे आणि हा दिवस देसी शैलीत साजरा केला जातो. असे हे गाणे आहे.

हे गाणे नृत्यदिग्दर्शक मुदस्सर यांनी कोरिओग्राफ केले आहे. डान्स मुव्ह्जसह, गाण्याचे व्हिज्युअल सुंदर झाले आहे. जे चाहत्यांसाठी एक मेजवानी ठरेल.

हे गाणे १ नोव्हेंबर रोजी रिलीज करण्यात आले. गाणे रिलीज करण्यासाठी, आयुषने जयपूर राजमंदिर सिंगल-स्क्रीन थिएटरला भेट दिली. तिथे तो त्या सर्व चाहत्यांना भेटला ज्यांचा वाढदिवस नोव्हेंबरमध्ये येतो.

गाण्याबद्दल बोलताना आयुष शर्मा म्हणाला, "भाई का बर्थडे हे गाणे खूप मस्त, सेलिब्रेट करण्यासारखे गाणे आहे. जेव्हा सगळे मित्र एखाद्या सेलिब्रेशनसाठी एकत्र येतात. तशा खूप खऱ्या आणि वास्तविक भावना यात आहेत. मी याचे शूटिंग करताना खूप एन्जॉय केले आहे.

विशेषतः डान्स स्टेप्स जे पूर्णपणे रॉ आणि देसी आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, गाणे चित्रपटात एक अतिशय मनोरंजक ट्विस्ट घेऊन येते, ज्यामुळे ते प्रत्यक्ष पाहण्यासारखे आणि मनोरंजक आहे.हे गाणे हितेश मोडक यांनी संगीतबद्ध केले आहे. बॅकग्राउंड वोकल्स साजिद खान यांनी केले आहे. नृत्य दिग्दर्शन मुदस्सर यांचे आहे. हा चित्रपट २६ नोव्हेंबरला ग्लोबली प्रदर्शित होणार आहे. सलमान खान, आयुष शर्मा आणि महिमा मकवाना यांच्या मुख्य भूमिकेत आहे. 'अंतिम: द फाइनल ट्रुथ' या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे.

हेही वाचलं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT