Anshula Kapoor Engagement who is boyfriend
मुंबई - बोनी कपूरची मुलगी आणि अभिनेता अर्जुन कपूरची बहिण अंशुला कपूरने साखरपुडा केला आहे. अंशुलाला तिचा बॉयफ्रेंड रोहन ठक्करने प्रपोज केले. न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये झालेल्या ड्रीम प्रपोजलचे फोटोज अंशुला कपूरने स्वत: सोशल मीडियावर शेअर केलं आहे. फोटोमध्ये रोहन ठक्कर गुडघ्यावर बसून तिला अंगठी घालताना दिसत आहे.
अंशुला आणि रोहन भेट पहिली भेट २०२२ मध्ये एका डेटिंग ॲपवर झाली होती. तेव्हापासून त्यांची केमिस्ट्री फॅन्ससाठी भावूक ठरलीय.
बोनी कपूरने कॉमेंट करत लिहिलं, 'दोघांवर परमेश्वराचा आशीर्वाद राहू दे. प्रतीक्षा आहे, तुम्ही दोघे भारतात या आणि घरात साखरपुड्याचे सेलिब्रेशन करा.'
रोहन ठक्कर एक भारतीय-अमेरिकन बिझनेसमॅन आणि स्क्रिप्ट रायटर आहे. तो न्यूयॉर्कमध्ये राहतो आणि डिजिटल मार्केटिंग, कंटेंट क्रिएशनमध्ये काम करतो.
अर्जुनने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं, 'माझ्या जीवनाने तिला नेहमीच स्वीकारलं आहे.… आज आईची खूपच आठवण झाली. तुम्हा सर्व लोकांना प्रेम.' जान्हवीने लिहिलं- बहिणीचा साखरपुडा झाला आहे..चांगल्यासाठी सर्वात चांगलं!' खुशीने म्हटलं- 'माझ्या बहिणीचे लग्न होणार आहे, आय लव्ह यू बोथ…'