Ankit Mohan Promotion Row pudhari
मनोरंजन

Ankit Mohan Promotion Row: फर्जंद फेम अंकितची प्रमोशनला दांडी; १ कोटीच्या दंडाची चर्चा असतानाच वर्तनुकीवर दिलं स्पष्टीकरण

Anirudha Sankpal

Ankit Mohan Promotion Controversy: मराठी नसूनही फर्जंदमध्ये साकारलेल्या भूमिकेमुळं अंकित मोहन हा महाराष्ट्रातील घराघरात पोहचला होता. त्याचे जेवढे नॉन महाराष्ट्रीयन फॅन नसतील तेवढे मराठी फॅन्स आहेत. मात्र हाच अंकित मोहन आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

'देवघर ऑन रेंट' या चित्रपटाच्या प्रमोशनला अंकित मोहन उपस्थित नसल्यामुळं चित्रपटाचे निर्माते आणि कलाकार देखील नाराज होते. अंकित मोहन चित्रपटाच्या प्रमोशनबाबत कोणताच प्रतिसाद देत नसल्याचे जाहीर वक्तव्य निर्माते आणि सह कलाकारांनी केलं होतं. त्यानंतर अंकितवर १ कोटीचा दंड देखील ठोठावण्यात येणार असल्याची चर्चा होता. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर अखेर अंकित मोहनने प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला अंकित?

सोशल मीडियावर पोस्ट करत अंकित म्हणतो की, 'जय शिवराय मित्रांनो, सर्वप्रथम, माझ्या संपूर्ण प्रवासात तुम्ही माझ्यावर जे प्रेम आणि आशीर्वादाचा वर्षाव केली, त्यासाठी मी मनापासून तुमचा आभारी आहे. हे सगळं केवळ शक्य झालं, कारण तुम्ही माझ्या कामाचं नेहमीच मनापासून कौतुक केलं आणि मला भरभरून प्रेम आणि प्रोत्साहन दिलं.

मराठी नसलो तरी...

अंकित पुढे लिहितो, मी मराठी नसलो, तरी तुम्ही मला मनापासून आणि प्रेमाने छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून स्वीकारलं, हे माझ्यासाठी खूप मोठं भाग्य आहे.

अंकितने 'देवघर ऑन रेंट' या चित्रपटाच्या प्रमोशन वादावर भाष्य केलं तो म्हणाला की, 'माझ्यासाठी काम हीच पूजा आहे. जर मी कुठे उपस्थित नव्हतो, तर त्यामागचं एकमेव कारण म्हणजे माझ्या आधीपासून ठरलेल्या कामाच्या कमिटमेंट्स होत्या.माझ्या बाजूची सत्य परिस्थिती काय आहे. हे जाणून घेण्याचा तुम्हा सगळ्यांना पूर्ण अधिकार आहे. आणि लवकरच माझ्या बाजूची ही गोष्टही मी तुमच्यासमोर मांडेन.

अंकितने चित्रपटाला दिल्या शुभेच्छा

अंकितने जरी चित्रपटाच्या प्रमोशनवरून वाद झाला असला तरी चित्रपटाला मात्र शुभेच्छा दिल्या. तो लिहितो की, 'पण आज या खास दिवशी, 'देवघर ऑन रेंट चित्रपटाच्या प्रीमियरच्या दिवशी, कोणत्याही नकारात्मक गोष्टींबद्दल बोलू नका. माझ्या बाजूने हे कधीच कोणतीही PR स्ट्रॅटेजी नव्हती. चला, चित्रपटाला मनापासून शुभेच्छा देऊया आणि चित्रपटाला खूप मोठं यश मिळो, अशी सदिच्छा व्यक्त करूया. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो! तुमचा मावळा, अंकित मोहन'

अंकितच्या या नव्या पोस्टमुळे अंकितचे प्रमोशनला न येणं अन् त्यावरून जाहीररित्या नाराजी व्यक्त होणं हा एक पीआरचा भाग तर नव्हताना अशी चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT