रणबीर कपूरचा सुपरहिट चित्रपट ‘अॅनिमल’ आता आंतरराष्ट्रीय स्तरावर नवा इतिहास रचत आहे. भारतात प्रचंड यश मिळवल्यानंतर आता या चित्रपटाची क्रेझ जपानमध्येही पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर खास घोषणा करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली असून, भारतीय सिनेमासाठी ही मोठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना आणि बॉबी देओल स्टारर "अॅनिमल" चित्रपट आता जपानमध्ये रिलीज होणार आहे. भारतातील त्यांच्या प्रचंड यशानंतर आता सातासमुद्रापार चित्रपट रिलीज होण्यासाठी सज्ज होत आहे. भारतात हा चित्रपट रिलीज होऊन २ वर्ष झाली आहेत. आता दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा हा चित्रपट दुसऱ्या देशात रिलीज करण्यास सज्ज आहेत.
रणबीर कपूर अभिनीत ‘अॅनिमल’ चित्रपटाने भारतात प्रचंड यश मिळवल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली छाप पाडण्यास सुरुवात केली आहे. निर्मात्यांनी केलेल्या खास घोषणेनुसार हा चित्रपट आता जपानमध्येही रिलीज होणार असून, यामुळे भारतीय सिनेमाच्या जागतिक प्रवासाला नवी दिशा मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.
अॅनिमल’ या चित्रपट रिलीज होताच प्रेक्षकांनी लक्ष वेधून घेतले होते. चित्रपटातील दमदार कथा, जबरदस्त अॅक्शन, भावनिक नातेसंबंध आणि रणबीर कपूरचा प्रभावी अभिनय यामुळे हा सिनेमा मोठ्या प्रमाणावर पसंतीस उतरला होता. भारतासह अनेक परदेशी बाजारातही या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.
चित्रपट कुठे प्रदर्शित होणार?
निर्मात्यांनी बुधवारी जाहीर केले की, हा चित्रपट पुढील वर्षी १३ फेब्रुवारी, २०२६ रोजी जपानमध्ये रिलीज होईल. चित्रपट निर्माता भद्रकाली पिक्चर्सने त्यांच्या एक्स अकाऊंटवर लिहिले आहे, "Kono otoko wa Darenimo Tomerarenai.'' सर्वात चर्चेत आणि अविस्मरणीय चित्रपट अनुभव जपानमध्ये येत आहे. 'अॅनिमल' १३ फेब्रुवारी २०२६ रोजी जपानी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होत आहे."
या महिन्यात सुपरस्टार अनिल कपूर आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी चित्रपटाचे दुसरे वर्ष सेलिब्रेट केले होते.
चित्रपटाला २ वर्षे पूर्ण
ॲनिमल चित्रपटाला २ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी रणबीर कपूरचा एक फोटो शेअर केला. त्यामध्ये कॅप्शन लिहिली होती- "अॅनिमलला दोन वर्षे". अनिल कपूरने चित्रपटातील अनेक व्हिडिओ तसेच पडद्यामागील काही फोटो देखील शेअर केले होते. या फोटोमध्ये संदीप रेड्डी वांगा रणबीरला शॉट्स समजावून सांगताना दिसले.
संदीप रेड्डी वांगा यांचा चित्रपट १ डिसेंबर २०२३ रोजी रिलीज झाला होता. हा चित्रपट त्या वर्षातील यशस्वी चित्रपट ठरला होता. या चित्रपटात रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर, तृप्ती डिमरी, बॉबी देओल यांच्या भूमिका होत्या.