कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडेचा चित्रपट 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी'ची टीजर रिलीज करण्यात आला आहे. हा टीजर पाहून फॅन्स चित्रपटाला ब्लॉकबस्टर म्हणत आहेत.
Ananya Panday-Kartik Aryan Tu Meri Main Tera Main TeraTu Meri teaser
मुंबई - कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडेचा चित्रपट 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी'ची टीजर रिलीज करण्यात आला आहे. हा टीजर पाहून फॅन्स चित्रपटाला ब्लॉकबस्टर म्हणत आहेत. हा टीझर २२ नोव्हेंबर कार्तिकचा वाढदिवसानिमित्त गिफ्ट आहे. आज तो आपला वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने रॉम-कॉम तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरीचा टीझर रिलीज झाला. चित्रपटामध्ये कार्तिक आणि अनन्याची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. कॉमेडी आणि रोमान्स सोबत कार्तिक चित्रपटामध्ये आपल्या डान्स मुव्ह्जने सर्वांना घायाळ करताना दिसणार आहे.
तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी चित्रपटाच्या १ मिनिट ३४ सेकंदाच्या टीजरची सुरुवात कार्तिक आर्यनच्या डायलॉग्जने होते. तो म्हणतो - 'मलाइका से लेकर मलाला तक, उर्फी से लेकर कमला तक, कोई भी इस मामाज बॉय को हाथ से ना जाने दें.' यानंतर कार्तिक सिक्स पॅक बॉडी फ्लॉन्ट करताना दिसतो. दरम्यान, अनन्या पांडेची एंट्री होते. ती म्हणते - 'मला २०२५ च्या हूकअप कल्चरमध्ये ९० ची लव स्टोरी हवीय.
'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरीचा टीजर पाहून वाटतं की, कार्तिक आर्यन एका श्रीमंत तरुणाची भूमिका साकारणार आहे. इन्स्टाग्रामवर तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरीचा टीजर शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिलंय- 'वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी खूप धन्यवाद. हे माझं रिटर्न गिफ्ट. तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरीचा टीजर रिलीज. या ख्रिसमसला चित्रपटगृहात पाहा.'
ब्लॉकबस्टर ठरणार चित्रपट?
तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरीच्या टीजरला फॅन्स पसंती देत आहेत. फॅन्स कॉमेंट करून प्रतिक्रिया देत असून चित्रपट ब्लॉकबस्टर ठरेल, असे म्हणत आहेत. एका सोशल मीडिया युजरने लिहिलं- 'आणखी एक सुपरहिट चित्रपट.' आणखी एकाने म्हटलं- 'हा वर्षाचा अखेरचा ब्लॉकबस्टर चित्रपट असेल.' दुसऱ्या फॅनने कॉमेंट केली- 'तर कार्तिक आणखी एक ब्लॉकबस्टर सोबत परत आला आहे.'
याशिवाय आणखी एका फॅनने चित्रपटाचा टीझर पाहून म्हटलं - 'हे आधीपासूनच ब्लॉकबस्टर वाईब्स देत आहे. त्यांची केमिस्ट्री प्रेश आणि चांगली वाटत आहे. सोबतच इतक्या दीर्घकाळानंतर रोमँटिक कॉमेडीमध्ये विशाल-शेखरचे म्युझिक... मी उत्सुक आहे.'