Amitabh Bachchan donates 11 lakhs rupees to Lalbaugcha Raja
मुंबई - बिग बी अमिताभ बच्चन यांनी 'लालबागचा राजा' साठी ११ लाख रुपये दान केल्याची माहिती समोर आलीय. अकीकडे त्यांचे फॅन्स कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे, सोशल मीडिया युजर्स यांनी पंजाबचा विषय छेडला आहे. नेमकं काय घडलं?
मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंडळ लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी खूप लांबून लोक येतात. रिपोर्टनुसार, यावेळी अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या मंडळासाठी ११ लाख रुपये दिले आहेत. त्यांनी आपल्या टीमकडून हे पैसे पाठवले आहेत. लालबागचा राजाचे ट्रस्टींनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अमिताभ बच्चन यांच्या ११ लाखांच्या दानाने भक्तांची मनं जिंकली तरी सोशल मीडियावर मात्र त्याबाबत नव्या प्रतिक्रियांना सामोरं जावं लागत आहे.
काही जण बिग बींना पंजाब पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सांगत आहेत. एकाने लिहिले, पंजाबसाठी दान दिला असता तर खूप आनंद झाला असता. आणखी एकाने लिहिले, पंजाबच्या मदतीसाठी तुम्हाला डोनेशन द्यायला हवं. दुसऱ्या युजरने लिहिले-जर पूरग्रस्तांना मदत केली असती किंवा एखादे गाव दत्तक घेतलं असतं तर थेट पैसे गणपती बाप्पांकडेच गेले असते.
पंजाबमध्ये पूरग्रस्तांना मदतीची गरज आहे. अनेक बॉलिवूड र्स्टार्स आणि सेलिब्रिटींना लोकांना मदत केल आहे. कुणी जेवण तर कुणी पाणी पोहचवत आहे.
दरम्यान, आयपीएल फ्रेंचायजी पंजाब किंग्सची मालकीण प्रीती जिंटाने जवळपास ३४ लाख रुपयांचे मदतीची घोषणा केलीय. इतकचं नाही तर ती क्राउडफंडिंगच्या माध्यमातून पैसे जमवत आहे.
बिग बी शेवटी वेट्टैयन चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत मुख्य भूमिकेत होते. आता ते सेक्शन ८४ चित्रपटात दिसणार आहेत.