

Kiku Sharda leave kapil sharma show
मुंबई - कीकू शारदाने सोडला 'द ग्रेट इंडियन कपिल शो'? कॉमेडीचा बादशहा कपिल शर्मा आपल्या भन्नाट जोक्स, किस्से आणि धमाल शैलीसाठी ओळखला जातो. त्यांच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मुळे प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन होत असते. या शोमध्ये कपिलसोबतच कृष्णा अभिषेक, सुनील ग्रोव्हर, अर्चना पूरणसिंह, राजीव ठाकूर यांच्यासह कीकू शारदा हेदेखील महत्त्वाचे चेहरे आहेत. कीकू बद्दल लीकडेच एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. कीकू शारदाने ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ सोडल्याची चर्चा रंगू लागली आहे. नेमकं सत्य काय आहे?
कीकूने आतापर्यंत ‘पलक’, ‘बच्चा यादव’ अशी पात्रे साकारली आहेत, जी आजही लोकांच्या लक्षात राहिली आहेत. कपिलच्या शोचा पहिला एपिसोड कलर्स टीव्हीवर रिलीज झाला होता, तेव्हापासून कीकू आणि कपिल एकत्र काम करत आहेत. कपिल शर्माच्या शोमध्ये अनेक कलाकार आले, पण किकू शारदा सगळ्यात खास आहे.
कपिल शर्माचा शो द ग्रेट इंडियन कपिल शोचा तिसरा सीझन नेटफ्लिक्सवर काही दिवसांपूर्वी सुरु झाला आहे. या सीझनमध्ये कीकू शारदा देखील दिसणार आहे. आता असं म्हटलं जात आहे की, कृष्णा अभिषेकशी झालेल्या वादानंतर कीकूने शो सोडला आहे. पण यामगील सत्य काय, याबद्दल शोची जज अर्चना पूरन सिंहने सांगितलं आहे.
अर्चना पूरन सिंह यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे की, कीकू शो सोडत नाही. तो शो सोडतोय ही माहिती अजिबात खरी नाही. आगामी एपिसोड्समध्ये तो तुम्हाला दिसेल. त्याने त्याचा पुढील प्रोजेक्ट सुरू करण्याआधी शोचे शूटिंग पूर्णकेले आहे. कीकू द ग्रेट इंडियन कपिल शोचा एक महत्वाचा हिस्सा आहे.
कीकू शारदा अशनीर ग्रोवरचा रिॲलिटी शो राईज अँड फॉलमध्ये दिसणार आहे. हा शो एमएक्स प्लेयरवर ६ सप्टेंबर पासून रू होणार आहे. यामध्ये अर्जुन बिजलानी, किकू शारदा, कुब्रा सैठ, धनश्री वर्मा, अरबाज पटेल असे अन्य कलाकार देखील प्रतिस्पर्धी असतील. हा शो ४२ दिवस चालणार असल्याचे म्हटले जात आहे.