सेंसरीन्यूरल नर्व हियरिंग लॉस हा अंतर्गत कानातील किंवा श्रवण नसांमधील बिघाडामुळे होणारा श्रवणविकार आहे. या आजारामुळे ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते किंवा अचानक श्रवणशक्तीवर परिणाम होऊ शकतो. वयोमान, मोठा आवाज, संसर्ग किंवा काही वैद्यकीय कारणांमुळे हा आजार उद्भवू शकतो. योग्य वेळी निदान आणि उपचार केल्यास त्याचे परिणाम नियंत्रित ठेवता येऊ शकतात.
what is Sensorineural Hearing Loss symptoms, causes and treatment
राष्ट्रपती भवन येथे पद्म पुरस्कार वितरणावेळी प्रसिद्ध बॉलिवूड गायिका अलका याज्ञिक या उपस्थित होत्या. त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संगीतातील अतुल्य योगदानाबद्दल पद्म भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. परंतु, पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी भावूक होत एका दुर्मिळ आजाराचा सामना करत असल्याचे सांगितले. शिवाय, आपल्या आरोग्यात हळूहळू सुधारणा होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच आपल्याला कठीण काळात पाठिंबा दिल्याबद्दलही सर्वांचे आभार मानले.
२३ जून रोजी पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली. गायिका अलका याज्ञिक यांना श्रवणाशी संबंधित हा दुर्मिळ सेन्सरी न्यूरल नर्व्ह हियरिंग डिसऑर्डर झाल्याचे वृत्त समोर आले. अलका याज्ञिक यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, गेल्या २ वर्षांपासून त्या सेन्सोरिन्यूरल नर्व्ह हिअरिंग लॉस या आजाराने त्रस्त आहेत. मागील दोन वर्षांमध्ये घडलेल्या घडामोडींविषयी त्यांनी सांगितले की, आरोग्याच्या समस्यांमुळे त्या बराच काळ लाईमलाईटपासून दूर होत्या.
अल्का याज्ञिक यांनी पोस्टमध्ये काय लिहिलं?
त्या म्हणाल्या की, "गेली दोन वर्षे मी प्रसिद्धीपासून आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर आहे. माझ्या जीवनाबद्दल फार काही सांगितले नाही. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहित होते की, मी आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत आहे. या काळात तुमचे प्रेम, प्रार्थना आणि खंबीर पाठिंबा मिळाला."
गायिकेला कधीपासून हा त्रास झाला?
२०२४ मध्ये एका फ्लाईटमधून बाहेर आल्यानंतर त्यांना जाणवलं की, त्यांना ऐकू येत नाहीये. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांना दाखवल तेव्हा ते म्हणाले होते की, ते एका व्हायरल ॲटॅकमुळे रेयर सेन्सरी नर्व हियरिंग लॉस झाले आहे.
सेंसरीन्यूरल हियरिंग लॉस (sensorineural nerve hearing loss) काय आहे?
सेंसरीन्यूरल हियरिंग लॉस (Sensorineural Hearing Loss - SNHL) हा ऐकण्याच्या क्षमतेशी संबंधित एक प्रकारचा बहिरेपणा आहे. यात कानाच्या आतील भागातील (Inner Ear) कॉक्लिया (Cochlea) किंवा मेंदूपर्यंत आवाज पोहोचवणाऱ्या श्रवण मज्जातंतूला (Auditory Nerve) नुकसान झाल्यामुळे ऐकण्याची क्षमता कमी होते.
कारणे
- ही समस्या अनेक कारणांनी होऊ शकते. तीव्र आवाज, इन्फेक्शन, ऑटोइम्यून आजार, दुखापत, न्यूरोलॉजिकल/ब्लड वेसलशी संबंधित काही समस्या, वाढते वय, जन्मजात दोष, डोक्याला झालेली दुखापत, काही औषधांचे दुष्परिणाम, आनुवंशिक कारणे
- हे कोणत्याही वयोगटातील लोकांना कधीही होऊ शकते. हा आजार तात्पुरता किंवा कायमचा होऊ शकतो.
- काही लोकांना जन्मापासूनच हा आजार होऊ शकतो. जेनेटिक किंवा प्रेग्नेंसीमध्ये येणाऱ्या समस्यांमध्ये हा आजार होऊ शकतो
- वाढत्या वयानुसार कानाच्या आतील भाग हळूहळू कमकुवत होतात
- मेनिन्जाइटिस, मम्प्स, ऑटोइम्यून आजार यासारखे आजार, इन्फेक्शनमुळेदेखील होऊ शकते
- डोक्याला दुखापतीमुळे ऐकू येणाऱ्या नसवर (ऑडिटरी नर्व) परिणाम होतो
- ओटोटॉक्सिक औषधे कानाच्या आतील भागातील सेंसरी सेल्सना नुकसान पोहोचवतात
लक्षणे
सामान्यपणे, यात बोलणे समजण्यास अडथळा येतो. आवाज स्पष्ट ऐकू न येणं, कानात आवाज येणं (टिनिटस), शरीराचे संतुलन राखण्यास अडथळा येतो
उपचार
बहुतांश प्रकरणात ही स्थिती ठीक केली जाऊ शकत नाही. पण हियरिंग एड, कॉक्लियर इम्प्लांट, औषधे आणि ऐकू येणाऱ्या मदत करणारे डिव्हाईस वापरले जातात.