‘लव्ह अँड वार’मधील आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा रेट्रो लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 70च्या दशकाची झलक देणाऱ्या या लूकने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढवली आहे. आलियाचा विंटेज अंदाज आणि रणबीरचा क्लासिक गेटअप भन्साळींच्या सिनेमाच्या भव्यतेला साजेसा दिसत असून, चित्रपटाबद्दलची चर्चा अधिकच वाढली आहे.
ranbir kapoor-alia bhatt retro look leaked love and war movie set
मुंबई - संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वार’ या बहुचर्चित चित्रपटातून नुकतेच आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचा रेट्रो लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे फोटोज सेटवरील असून ते फॅन पेजवरून शेअर करण्यात आले आहेत. या दोन्ही कलाकारांना एका क्लासिक, सत्तरच्या दशकाची झलक देणाऱ्या स्टाईलमध्ये पाहायला मिळत आहे. त्यांचा हा लूक पाहून नेटिझन्सनी कॉमेंट्सचा वर्षाव सुरू केला आहे.
फोटोंमध्ये आलिया भट्टने विंटेज साडी लूक केला आहे. व्हाईट कलर साडी, क्लासिक आयलाइनर आणि रेट्रो हेअरस्टाईलमध्ये दिसतेय. दुसरीकडे, रणबीर कपूरचा लूक देखील तितकाच आकर्षक आहे. त्याने स्टायलिश फॉर्मल शर्ट, टाय, हेअरस्टाईल आणि हलका मेकअप लूक ठेवला आहे. ज्यामुळे चित्रपट एका वेगळ्या काळाची आठवण करून देतो.
'लव्ह अँड वॉर' चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी करत आहेत. रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाच्या सेटवरून रणबीर आणि आलियाचे फोटो समोर आले आहेत.
हा चित्रपट मुळात एक रोमँटिक-ट्रॅजिक ड्रामा असल्याची चर्चा आहे. भन्साळींच्या चित्रपटाच्या शूटिंगचे काही टप्पे पूर्ण झाले असून, पुढील काही महिन्यांत आणखी अपडेट्स बाहेर येण्याची शक्यता आहे. याआधी आलिया-रणबीरची जोडी 'ब्रह्मास्त्र'मध्ये दिसली होती. आता पुन्हा मोठा पडद्यावर त्यांना एकत्र पाहणे, फॅन्ससाठी पर्वणीच असेल. त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीबद्दल सोशल मीडियावर देखील मोठ्या चर्चा सुरू आहे.
व्हायरल झालेल्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून तुफान कॉमेंट्सचा पाऊस पडतोय. चित्रपटाचा लूक, फील आणि स्टाईलमुळे भुरळ पडलीय, ‘लव्ह अँड वार’ हा सिनेमा वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरेल, असेही सोशल मीडिया युजर्सनी म्हटलं आहे.