Alia Bhatt reaction on childhood own photo HugMyYoungerSelf trend
मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट एका एआय ट्रेंडमुळे चर्चेत आली आहे. सर्वांचे नेहमीच आपल्याकडे लक्ष वेधून घेणारी आलिया एका फोटोमुळे चर्चेत आलीय. सोशल मीडियावर तिचा प्रत्येक लूक, फोटो किंवा व्हिडिओ काही क्षणात व्हायरल होत असतात. सध्या आलियाचा एक हटके फोटो व्हायरल झाला आहे, ज्यात तिने गूगल जेमिनीच्या नव्या #HugMyYoungerSelf हा ट्रेंड वापरून फोटो व्हायरल केला आहे.
या ट्रेंडनुसार, व्यक्तींना त्यांच्या लहानपणीच्या फोटोसोबत आजचा आपला फोटो पाहायला मिळतो. आलियानेही आपल्या बालपणीचा गोड फोटो शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती आपल्या बालपणीतल्या आलियाला "मिठी" मारताना दिसते. फॅन्सनी हा फोटो पाहून सोशल मीडियावर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
ट्विटर, इन्स्टाग्राम हा ट्रेंड तुफान व्हायरल झाला असून #HugMyYoungerSelf हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहे. आलियाचा हा फोटो पाहून अनेकांना स्वतःच्या बालपणाच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. 'खूप क्यूट दिसतेस', 'ही कल्पना हार्ट टचिंग आहे', 'तुझ्या लहानपणीच्या फोटोलाही स्टारडमचा अंदाज आहे' अशा कॉमेंट्स फॅन्सनी दिल्या आहेत.
आलिया भट्टने हा फोटो इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केला आहे. खरंतर एका फॅन पेजने आलियाचा आजच्या फोटोसह तिचा बालपणीचा फोटो हग करताना एडिट केला. या फोटोवर कॅप्शन लिहिलं होतं- 'मी नाही करू शकत, आज छोटीला किती गर्व वाटत असेल.’ यानंतर आलिया भट्टने हा पोटो पुन्हा आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. सोबतच कॅप्शन लिहिली की- ‘कधी-कधी आपल्याला आपल्या आतील ८ वर्षाच्या मुलाला मिठी मारावी लागते. यासाठी धन्यवाद.'’ तिने फोटोच्या बॅकग्राऊंडमध्ये टेलर स्विफ्टचे गाणे ‘द वे आय लव्ह यू’ देखील लावले आहे.
आलिया यशराजचा स्पाय युनिव्हर्स चित्रपट ‘अल्फा’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी अखेरला रिलीज होईल, असे म्हटले जात आहे. यामध्ये बॉबी देओल आणि शर्वरी वाघ यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. शिवाय, ती संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. यामध्ये रणबीर कपूर-विक्की कौशल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.