अक्षय खन्नाच्या ‘धुरंधर’ चित्रपटातील FA9LA गाण्यावरचा इम्प्रोव्हायझ्ड डान्स व्हायरल झाला असून सोशल मीडियावर तो प्रचंड लोकप्रिय ठरला आहे. हा सीन कोरिओग्राफ नव्हता, अक्षयने अचानकच केलेली स्टेप इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
Akshaye Khanna Dance steps from movie Dhurandhar
रणवीर सिंह नाही, संजय दत्त नव्हे तर चर्चा रंगली आहे ती अक्षय खन्नाची. अभिनेता अक्षय खन्नाने भल्याभल्या स्टार्सना मागे टाकलं आहे. कारण आहे-धुरंधर चित्रपट. ५ डिसेंबर रोजी हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर चर्चा होऊ लागली ती अक्षय खन्नाचीच.
FA9LA वरचा जल्लोष; सोशल मीडियावर तूफान
न कोणती दाढी, न कोणती बॉडी, न अडल्ट सीन, न शिव्याशाप तरीही भावाने मार्केट जाम केलं, अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येत आहे. सोशल मीडियावर मीम्स, एआय जनरेटेड फोटो आणि अक्षयवर चित्रीत करण्यात आलेल्या गाण्याचे धुमाकूळ आहे. शिवाय हमराजचे सिक्वेल बनवण्याची मागणीही नेटकरी करत आहेत. काही जणांनी नेपोटिझमचा मुद्दा उचलला. पण अक्षयच्या अभिनयापुढे ते अपयशी ठरल्याचे दिसते.
डान्समधील आयकॉनिक स्टेप आली कुठून?
रिपोर्टनुसार, अक्षय खन्नाच्या डान्ससाठी कोरिओग्राफर नव्हता. अक्षयने स्वत: डान्स स्टेप तयार केले. त्याने दिग्दर्शकाला विचारले की, मी ही स्टेप्स करू शकतो का? होकार मिळाल्यानंतर अक्षयने स्वत: डान्स केला जो इतका व्हायरल झाला की, सर्वजण आश्चर्यचकित होत आहेत, अशी माहिती सहकलाकार दानिश पंडोरने दिली.
“FA9LA” नावाच्या गाण्याचे स्वर खलीजी हिप-हॉप कलाकार Flipperachi ने बनवले आङेत. यात अक्षय खन्नाने एक जबरदस्त एंट्री आहे. या सीनमध्ये, त्याचा रोल म्हणजे ‘रहमान डकैत’, जो एक शक्तिशाली आणि भयंकर गँगस्टर, राजकारणी आहे. सीन सुरू होतो जिथे तो गाडीमधून उतरतो, शांतपणे ‘सलाम’ करतो, आणि पारंपरिक डान्स पाहतो. सोबतच काही स्टेप्स करतो, जे रातोरात व्हायरल झाल्या आहेत. Flipperachay चे खरे नाव हुसम असीम आहे.
अक्षयकडे किती संपत्ती?
अक्षय खन्नाकडे समुद्रकिनारी जुहूमध्ये साडे तीन कोटींचा बंगला आहे. अलिबागमध्ये एक फार्महाऊस आहे. शिवाय ६० कोटींची मालाबार हिलमध्ये एक हवेली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, केवळ १०० कोटींच्या आसपास घरांची किंमत आहे. शिवाय एका चित्रपटासाठी तो २ ते अडीच कोटी घेतो. धुरंधरसाठी त्याने इतकी रक्कम वसूल केल्याचे म्हटले जाते.
अक्षयच्या झोळीत पडले इतके चित्रपट
धुरंधरमध्ये जलवा दाखवल्यानंतर अक्षयच्या झोळीत एकापेक्षा एक चित्रपट पडले आहेत. धुरंधर नंतर त्याचे ६ चित्रपट रिलीज होतील.
धुरंधर पार्ट - २
इक्का
महाकाली
दृश्यम ३
जासूसी थ्रीलर
सेक्शन ८४