Mahesh Jirawala death confirms in Ahmedabad plane crash Instagram
मनोरंजन

Ahmedabad plane crash Mahesh Jirawala | चित्रपट निर्माते महेश जिरावाला यांचा मृत्यू विमान दुर्घटनेतच, DNA अहवालानंतर कुटुंबीयांनी स्वीकारलं सत्य

Air India Ahmedabad plane crash Mahesh Jirawala | चित्रपट निर्माते महेश जिरावाला यांचा मृत्यूचं, DNA अहवालानंतर कुटुंबीयांनी स्वीकारलं सत्य

स्वालिया न. शिकलगार

Air India Ahmedabad plane crash Mahesh Jirawala death

मुंबई - अहमदाबादमधील मेघानीनगरमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाचे विमान कोसळले होते. तेव्हापासून गुजराती चित्रपट निर्माते महेश जीरावाला बेपत्ता होते. महेश यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन दुर्घटनेच्या आसपास ट्रॅक करण्यात आले होते. अंदाज लावला जात होता की, महेश जीरावाला यांचा मृत्यू या दुर्घटनेतच झाला आहे. आता याची पुष्टी करण्यात आली आहे.

चित्रपटसृष्टीत महेश जिरावाला या नावाने ओळखले जाणारे महेश जीरावाला १२ जून २०२५ पासून बेपत्ता होते. त्यांचा मोबाईल शेवटचं अपघातस्थळापासून सुमारे ७०० मीटर अंतरावर ट्रेस झाला होता. त्यांच्या बेपत्ततेमुळे कुटुंब चिंतेत होतं आणि अनेक दिवसांनीही ते परत न आल्याने नातेवाईकांकडून सत्य नाकारलं जात होतं. कुठंतरी ते सुरक्षित असावेत, असे कुटुंबीयांना वाटत होते. दरम्यान, शाहीबाग परिसरातील अपघातस्थळी एक जळालेली ॲक्टिव्हा स्कूटर सापडली. ती स्कूटर महेश जीरावालांच्या नावावर नोंदणीकृत असल्याचे तपासात स्पष्ट झाले.

महेशच्या कुटुंबीयांचे डीएनए सँपल देखील घेण्यात आले होते. मात्र, डीएनए तपासणीचे निष्कर्ष आणि स्कूटरच्या इंजिन व चेसिस नंबरच्या तपासणीनंतर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. अखेर ३४ वर्षीय महेशचा मृत्यू झाल्याचे निश्चित झाल्यानंतर त्यांचे कुटुंबीयांनी वास्तव स्वीकारले आणि मृतदेह ताब्यात घेतला.

महेश १२ जून रोजी अहमदाबादच्या लॉ गार्डन परिसरात कुणालातरी भेटण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. मात्र, त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला आणि ते घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी पोलिसांत ते बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून शेवटी ते अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलजवळील अपघातस्थळाजवळ दिसल्याचं निष्पन्न झालं होतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT