Aamir Khan Sitaare Zameen Par selection of Genelia Deshmukh
मुंबई - काही चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर पुन्हा आमिर खानने जोमाने नव्या चित्रपटावर काम सुरु केलं आणि सितारें जमीन पर हा चित्रपट धुमधडाक्यात चित्रपटगृहात रिलीज केला. चित्रपटातील संवाद असो वा अभिनय सर्व काही उत्तम. चित्रपटाची कहाणी असो वा कलाकार सर्व प्रवास कसा घडला, याबाबत दिग्दर्शक आर एस प्रसन्ना यांनी सांगितले. चित्रपटासाठी जेनेलियाचं नाव कोणी सुचवलं, हा चित्रपट इतका महत्त्वाचा का ठरतो, याबाबत त्यांनी एका मुलाखतीत बातचीत केली.
ते आर एस प्रसन्ना म्हणाले, जेव्हा ही कहाणी माझ्याकडे आली. लेखक विपीन शर्मा यांच्याशी बोललो. या कहाणीमध्ये भावना आहेत, स्पोर्ट्स एनर्जी आहे. या चित्रपटाला न्याय देण्यासाठी आमिर खानचं परफेक्ट असल्याचं मला वाटलं. नवं स्क्रिप्ट आणि नव्या विशेष मुलांसोबत काम करण्याची संधी मिळाली. प्रत्येक दिग्दर्शकाला वाटतं की, आमिर खानसोबत काम करावं. माझं भाग्य आहे की, आमिर खानने मला निवडलं.

''त्यांच्या मॅनेंजरला मी भेटलो, तेव्हा मी म्हणालो की, मी १० वर्ष या करिअरमध्ये आहे. जेव्हा चांगले स्क्रिप्ट मिळेल, मी आपल्याकडे येईन आणि तुम्ही आमिर सरांना दाखवा. मी 'सितारे जमीन पर' चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन गेलो, ती त्यांनाही आवडली आणि आमिर सरांनादेखील.''
या चित्रपटासाठी आर एस प्रसन्ना यांनी कास्टिंग करताना २५०० हजारहून अधिक ऑडिशन घेतले गेले, अनेक ऑर्गनायझेशनना भेट दिली. त्य़ांना १०० कलाकार हवे होते. त्यांचं कास्टिंग करणं, त्यांचं बास्केटबॉलचे प्रशिक्षण देणं, सर्व कठीण होतो. '.आम्ही थकत होतो..पण कलाकार थकत नव्हते,' असे प्रसन्ना यांनी नमूद केले.
सितारें जमीन पर साठी अभिनेत्रीचा शोध सुरु होता. बातचीतमध्ये आमिर म्हणाले की, मी अलिकडे रितेशला भेटलो आहे आणि जेनेलिया उत्तम ठरेल. आमिर खानने जेनेलियाचं नाव चित्रपटासाठी सुचवलं होतं, असे प्रसन्ना यांनी सांगितले. दोन-तीन सीन्स केले, टेस्ट केलं, त्यावरून प्रसन्ना यांना वाटलं की, त्यांची पडद्यावर केमिस्ट्री परफेक्ट होईल, असंही त्यांनी नमूद केलं.