Ahaan Panday Dating Actress Shruti Chauhan rumored  Instagram
मनोरंजन

Saiyaara Ahaan Panday Dating | एका पोस्टमुळे चर्चेला उधाण; सैयारा फेम अहान पांडे 'या' अभिनेत्रीला करतोय डेट?

Ahaan Panday Dating Actress Shruti Chauhan | एका पोस्टमुळे चर्चेला उधाण; सैयारा फेम अहान पांडे 'या' अभिनेत्रीला करतोय डेट?

स्वालिया न. शिकलगार

Ahaan Panday Dating Actress Shruti Chauhan rumored

मुंबई - सैयारा फेम अहान पांडेची सध्या जोरदार चर्चासुरु आहे. अहान पांडेच्या खासगी जीवनाबद्दल बोलायचे झाले तर तो अभिनेत्री श्रुती चौहानला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. अहान पांडेचा डेब्यू चित्रपट सैयारा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अहान पांडे - अनीत पड्डा यांच्या चर्चेदरम्यान आता अभिनेत्री श्रुती चौहानचे नाव समोर आले आहे. असे म्हटले जात आहे की, अहान पांडे श्रुतीला डेट करत आहे.

कुठून सुरु झाली श्रुती चौहानच्या नावाची चर्चा

अहान पांडेच्या डेब्यूवर श्रुती चौहानने पोस्ट केलीय त्यानंतर तिचे नाव अहानशी जोडले जात आहे. त्यानंतर असा कयास लावला गेला की, अभिनेत्री श्रुती आणि अहान डेट करत आहेत

श्रुतीला डेट करत आहे अहान पांडे?

पण सूत्रांच्या माहितीनुसार, अहान श्रुतीला डेट करत नसल्याची माहिती समोर आलीय. अहानच्या जवळच्या लोकांचे म्हणणे आहे की, श्रुतीने ती पोस्ट केवळ आहानची खरी प्रशंसा आणि समर्थनसाठी लिहिली होती न की रोमान्समुळे. चित्रपटाच्या यशानंतर श्रुतीने पोस्टमध्ये जे लिहिलं त्यामुळे चर्चा झाली की, अहान - श्रुती एकमेकांना डेट करत आहेत.

श्रुतीने काय लिहिलं?

श्रुतीने पोस्टमध्ये लिहिलं- त्या तरूणाने आयुष्यभर याचे स्वप्न पाहिले, ज्याने यावर विश्वास केला, जेव्हा त्याच्यावर कुणीही विश्वास नाही केला. त्या तरुणाने या क्षणासाठी सर्व काही दिलं. हा स्टेज तुझं आहे अहान, आय लव्ह यू आणि मला तुझा अभिमान आहे.

सैयाराची किती कमाई

सैयारा चित्रपट १८ जुलै रोजी रिलीज झाला होता. रिपोर्टनुसार, आतापर्यंत चित्रपटाने १३२.२५ कोटी कमाई केली आहे.

श्रुती चौहान कोण आहे?

श्रुती एक अभिनेत्री आणि मॉडल आहे. चित्रपट आणि डिजिटल जगतात तिने आपले नाव कमावले आहे. जोया अख्तरचा चित्रपट गली बॉय मध्ये तिने माया ही भूमिका साकारली होती. रिपोर्टनुसार, श्रुती जयपूरची राहणारी आहे तिने ज्योती विद्यापीठ कॉलेजमधून कलामध्ये पदवी घेतली आहे. ती अनेक म्युझित व्हिडिओमध्ये दिसली होती. गायक जुबिन नौटियाल सोबत ती 'हद से' या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT