Ahaan Panday New Film signed
मुंबई – बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सची एन्ट्री काही नवी नाही. मात्र नुकताच पदार्पण करणारा अहान पांडे सध्या इंडस्ट्रीत चर्चेचा विषय ठरत आहे. यशराज फिल्म्सच्या सैयारा या चित्रपटातून आपली दमदार एन्ट्री करणाऱ्या अहानने प्रेक्षक आणि समीक्षकांची दाद मिळवली होती. त्याच्या लूकपासून अभिनयापर्यंत, चाहत्यांना हा नवा हिरो भावला. पहिल्याच प्रयत्नात त्याला यश मिळाले आणि प्रचंड यशानंतर अहानने दुसरा चित्रपट साईन केलं आहे.
सैयारा रिलीज झाल्यानंतर आता अहानच्या करिअरला आणखी एक मोठी गती मिळाली आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफरने त्याला आपल्या पुढील प्रोजेक्टसाठी साईन केले असल्याची माहिती समोर आली आहे. अली अब्बास जफर म्हणजे सुलतान, टायगर जिंदा है, भारत सारख्या ब्लॉकबस्टर हिट्स देणारे दिग्दर्शक आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत अहानला काम करण्याची संधी मिळणे, त्याच्यासाठी सुवर्णसंधी आहे.
अहान पांडेने आपल्या पहिल्या चित्रपटात मोहित सुरी यांच्यासोबत काम केलं होतं. आता अली अब्बास जफर यांनी आपल्या चित्रपटात त्याला साईन केलं आहे. रिपोर्टनुसार, अली अब्बास जफर यांचा चित्रपट आदित्य चोप्रा प्रोड्यूस करतील. हा एक ॲक्शन रोमँटिक चित्रपट असणार आहे.
आदित्य चोप्रा आणि अली यांनी चित्रपटाची स्क्रिप्ट फायनल केली आहे. त्याचे संगीत केलं जाणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग २०२६ रोजी सुरुवात होईल. अली आणि आदित्य यांनी 'मेरे ब्रदर की दुल्हन', 'गुंडे', 'सुलतान' आणि 'टायगर जिंदा है' प्रोजेक्टवर एकत्र काम केले आहे.