मनोरंजन

Adnan Sami : नाटू-नाटूवरून जगन मोहन रेड्डी-अदनान सामी यांच्यात छेडलं ट्विटर वॉर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळालेल्या RRR या चित्रपटातील नाटू-नाटू गाण्यावरून सध्या वाद सुरू झाला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन यांनी या गाण्याचे अभिनंदन करण्यासाठी केलेल्या ट्विटवरून हा वाद सुरू झाला आहे.

जगनमोहन यांनी या गाण्याचे अभिनंदर करत तेलुगु झंडा ऊंच फडकत आहे, अशी प्रतिक्रिया दिली. याला गायक अदनान सामी याने आक्षेप घेतला आहे.  "आपण सर्व आधी भारतीय आहोत," असे अदनान सामी यांने म्हटले आहे. याच मुद्द्यावरून जगन मोहन रेड्डी-अदनान सामी यांच्यात ट्विटर वॉर छेडलं गेलं.

जगन मोहन रेड्डी म्हणाले, "आंध्र प्रदेशकडून मी आरआरआरच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देतो. आम्हाला तुमचा अभिमान आहे." अदनान सामीने याला आक्षेप घेतला.

अदनान म्हणाला, 'तेलुगु झंडा? तुमचा अर्थ आहे हा भारताचा झंडा आहे? आम्ही आधी सर्व भारतीय आहेत. म्हणून कृपया देशाचे अन्य भाग वेगळं करणं बंद करा. आमचा एक देश आहे…'

अदनान सामीला २०१६ मध्ये भारतीय नागरिकत्व देण्यात आले होते.

SCROLL FOR NEXT