Adinath Kothare system movie  pudhari photo
मनोरंजन

Adinath Kothare system movie | 'आपण मॅनिफेस्ट केलेल्या गोष्टी पूर्ण होतात., माझंही स्वप्न पूर्ण..', आदिनाथ कोठारेने शेअर केला अनुभव

इच्छाशक्तीचं फळ! आदिनाथ कोठारेची 'सिस्टम' मधील एन्ट्री आणि त्याच्या निवडीची रंजक गोष्ट

स्वालिया न. शिकलगार

मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे यांनी ‘सिस्टम’ चित्रपटाच्या निमित्ताने एक भावनिक अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे. “आपण मॅनिफेस्ट केलेल्या गोष्टी पूर्ण होतात” असे सांगत त्यांनी आपल्या स्वप्नपूर्तीबद्दल भावना व्यक्त केल्या. त्यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा होत असून चाहत्यांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता आदिनाथ कोठारे सध्या त्याच्या 'सिस्टीम' या आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत आहे. सिस्टीम हा त्याच्या आगामी चित्रपटामध्ये तो ‘आलोक’ची भूमिका साकारतोय. त्याने त्याच्या नशीबत घडलेला एक महत्वाचा अनुभव शेअर केला आहे. दिग्दर्शिका (Ashwiny Iyer Tiwari) यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याला ऑडिशनचा कॉल आला आणि तो या प्रोजेक्टचा भाग बनला. या मालिकेत तो आशुतोष गोवारीकर आणि सोनाक्षी सिन्हा यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

इच्छाशक्तीचं फळ!

ॲमेझॉन प्राईमच्या या कलाकृतीत आदिनाथने 'आलोक' ही महत्त्वाची भूमिका साकारली असून, ही संधी त्याला कशी मिळाली याची एक रंजक आणि 'फिल्मी' गोष्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

आदिनाथच्या मते, जर आपण एखादी गोष्ट मनापासून मिळवण्याची इच्छा धरली (मॅनिफेस्ट केली), तर ती नक्कीच पूर्ण होते. याचा प्रत्यक्ष अनुभव त्याला 'सिस्टम'च्या कास्टिंगवेळी आला. एका बॉलिवूड पुरस्कार सोहळ्यादरम्यान आदिनाथची भेट प्रसिद्ध दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी यांच्याशी झाली होती. त्यावेळी आदिनाथने त्यांना सहजपणे त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा बोलून दाखवली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अगदी दुसऱ्याच दिवशी त्याला या भूमिकेसाठी कास्टिंगचा फोन आला. ऑडिशन यशस्वी झाल्यानंतर त्याची या फ्रोजेक्टमध्ये एन्ट्री झाली.

दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर

'सिस्टम'मध्ये आदिनाथला अनुभवी अभिनेते व दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. हे त्याचे एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखे असल्याचे त्याने म्हटले आहे. आगामी बिग बजेट प्रोजेक्ट्स: आदिनाथ येणाऱ्या काळात केवळ ओटीटीवरच नाही, तर बॉलिवूडमधील अनेक मोठ्या प्रकल्पांमध्ये दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो 'रामायण' आणि 'गांधी' यांसारख्याचित्रपटांचाही भाग असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT