मनोरंजन

Sonam : कधी कधी १०-१२ तास झोपते, सोनम जातेय ‘या’ अडचणींतून

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाइन डेस्क

अभिनेत्री सोनम कपूर ऑगस्टमध्ये पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, गरोदरपणाच्या पहिल्या ३ महिन्यांत तिला कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागलाय. २१ मार्च रोजी सोनमने पती आनंद आहुजासोबतचे फोटो शेअर करून चाहत्यांना खुशखबर दिली होती. सोनमने पहिल्या तीन महिन्यातचं तिला अडचणींबद्दल सांगितले आहे.

सोनम कपूरने २१ मार्च रोजी तिच्या प्रेग्नेंसीची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. सोनमने नुकतेच मॅटर्निटी फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली. सोनम तिच्या प्रेग्नेंसी काळ एन्जॉय करत आहे. मात्र या टप्प्यात तिलाही अनेक बदलांमधून जावे लागले.

सोनम कपूरने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले की, प्रेग्नेंसीच्या पहिल्या तीन महिन्यांत तिच्या शरीरात कोणते बदल होतायत आणि ती त्यांना कशी सामोरे जाते. सोनम म्हणाली की, गेले तीन महिने तिच्यासाठी खूप कठीण गेले. तुमचे शरीर दर आठवड्याला, रोज बदलते आणि तुम्हाला प्रत्येक वेळी नवीन अनुभव येतो." कधी-कधी मला झोप येत नाही कारण मला पुन्हा पुन्हा बाथरूममध्ये जावं लागतं… कधी-कधी मी १०-१२ तास झोपते."

मुलाखतीत सोनम म्हणाली, 'मला पुरेशी झोप येत नाही आणि त्यामुळे माझी कामे राहून जातात. कधीकधी मला झोप येत नाही. कारण एकतर उन्हाचा त्रास असतो किंवा मी १०-१२ तास इतकी गाढ झोपतो की कोणीही मला उठवू शकत नाही. ३ दिवसांपूर्वी मी एक झूम कॉल मिस केला. मी लवकर उठणाऱ्यांपैकी एक आहे. त्या दिवशी सकाळी साडेआठ वाजले होते आणि मी अंथरुणातून उठू शकले नाही.

सोनमने २०१८ मध्ये आनंद आहुजासोबत लग्न केले होते. लग्न झाल्यापासून सोनम पतीसोबत लंडनमध्ये राहतेय. पण, मध्यंतरी असे वृत्त आले होते की, ती आपले वडील अनिल कपूर यांच्या घरी राहतेय. ती सध्या तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आहे. ज्यामध्ये ती ब्लॅक कलरच्या क्रॉप टॉपमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसतेय.

चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, सोनम शेवटची २०२० मध्ये AK vs AK मध्ये दिसली होती. लवकरच ती 'ब्लाइंड' या चित्रपटात दिसणार आहे.

बेबी बंप लपवण्यासाठी सैल कपडे वापरले

सोनमने आणखी एका गोष्टीचा खुलासा केला की, तिने प्रेग्नेंसीच्या सुरुवातीला तिचा बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न केला होता. ती म्हणाली, "आता मी मोकळेपणाने बोलत आहे, पण पूर्वी ते लपवण्यासाठी मी सैल कपडे घातले होते."

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT