अभिनेत्री श्रुती हसन कोणत्या न कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते. कधी पर्सनल लाईफमुळे, कधी तिच्या विधानांमुळे तर कधी तिच्या सिनेमांमुळे. अलिकडेच एका मुलाखतीदरम्यान तिने केलेल्या विधानामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
श्रुती या मुलाखतीमध्ये बोलताना लग्न आणि मुलांबाबत बोलताना दिसते आहे. ती म्हणते तिची लग्न करण्याची इच्छा नाही. ती प्रामाणिकपणा आणि वचनबद्धता यांचा आदर करते. पण लग्नाच्या संकल्पनेची तिला भीती वाटते. तिने यावेळी हे उघड केले की एका व्यक्तीसोबत पुढे जाण्याचा विचार केला होता. पण त्यांच्या मधील मतभेदांमुळे गोष्टी पुढे जाऊ शकल्या नाहीत. श्रुती म्हणते की ती सध्या सिंगल आहे. हे सिंगल असणं आणि आयुष्यातील हा काळ ती स्वत:सोबत असणे एंजॉय करते आहे.
एका पोडकास्ट दरम्यान बोलताना ती म्हणते, ‘ मला लग्नाची संकल्पना खूप घाबरवते आहे. स्वत:च्या मनाप्रमाणे जगण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. कोणत्याही कागदाच्या तुकड्याने कुणाशी जोडले जाण्याची संकल्पना मला भीतीदायक वाटते एवढेच मला सांगायचे आहे.
प्रामाणिकपणा आणि लग्नासोबत येणाऱ्या अनेक सुंदर भावनांवर माझा विश्वास आहे. हे मला माझ्या पद्धतीने करायला आवडेल. त्यासाठी मला कागदाच्या तुकड्याची गरज नाही.
अनेकदा लग्न करण्याच्या इच्छेच्या जवळ आल्याची कबुली तिने यावेळी दिली. पण सहजभाव नव्हता. अर्थात हे भविष्याबाबत असल्याने त्यात बऱ्याच शक्यता आहे.
आई होण्याच्या इच्छेबाबत बोलताना श्रुती म्हणते, ‘मला नेहमीच आई व्हायचे होते. पण मला कधी सिंगल मदर होण्यात रस नाही. कारण मुलांसाठी आई वडील महत्त्वाचे असतात. जर तुम्ही दोन्ही भूमिकेत सक्षम असाल तर उत्तम आहे. पण याचा अर्थ सिंगल पेरेंटिंग चुकीचे आहे असे अजिबात नाही. पण मी अडोप्ट करू शकते. माझा असा विचार आहे की मुले वाढवणे हे छान आहे.
श्रुती सध्या कुणासोबत नात्यात
ती सध्या कोणालाही डेट करत नसल्याचे स्पष्ट केले. ती म्हणते, सध्या मी स्वत:च्या प्रेमात आहे. असे किती लोक आहेत जे आपल्या आयुष्यात नवीन व्यक्ति तिची मूल्ये जोडली जावीत यासाठी पार्टनर निवडते? बरेचजन केवळ यासाठी पार्टनर निवडतात की त्यानं एकटे वाटत असते.
माझे एकटे असणे हा एकाकीपणा नाही तर त्यापूर्वी स्वत:सोबत आरामदायी असणे हा अर्थ त्यात आहे.’
श्रुती हसनही अभिनेते कमल हसन आणि सारिका यांची मुलगी आहे. या दोघांच्या लग्नापूर्वीच श्रुतीचा जन्म झाला होता
अभिनेत्री श्रुतीने आजवर हिंदी आणि दक्षिणात्य सिनेमात काम केले आहे
मागील वर्षी ती शंतनू हजारिकासोबत नात्यात होती. मागील वर्षी त्यांनी हे नाते संपल्याची घोषणा केली होती.
श्रुती लवकरच कुली या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार होते.