Yere Yere Paisa 3: येरे येरे पैसा 3 साठी कुशल बद्रिकेची खास पोस्ट; म्हणतो मुलीला नीट नांदवा

5 कोटी आणि सोन्याच्या बिस्कीटांचा शोध या सिनेमाच्या तिसऱ्या भागात पाहायला मिळणार आहे
Yere Yere Paisa 3: येरे येरे पैसा 3 साठी कुशल बद्रिकेची खास पोस्ट; म्हणतो मुलीला नीट नांदवा
Published on
Updated on

कॉमेडी आणि ड्रामा यांचे धमाल मिश्रण असलेला सिनेमा येरे येरे पैसा 3 रिलीजसाठी सज्ज आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर लॉंच सोहळा पार पडला. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी हे उपस्थित होते. 5 कोटी आणि सोन्याच्या बिस्कीटांचा शोध या सिनेमाच्या तिसऱ्या भागात पाहायला मिळणार आहे.

या सिनेमाचा प्रीमियर नुकताच पार पडला. यावेळी अभिनेता कुशल बद्रिके याने अत्यंत हटके पोस्ट लिहीत येरे येरे पैसा 3च्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या पोस्टमध्ये कुशल म्हणतो, 'एक सिनेमा release करणे म्हणजे पोरीचं लग्न लाऊन देण्या सारखं आहे. म्हणजे कसं, मुलीला चांगलं शिकवायचं, छान संस्कार करायचे आणि वयात आली, की एखादा मुहूर्त बघून लाऊन द्यायचं लग्न , आता audience म्हणून सासरची माणसं ठरवणार तिचं भवितव्य!
हां आता काही मुली live in relationship मधे OTT वर रहातात, पण संजय जाधवांची कन्या ची. सौ. का. “येरे येरे पैसा”. रीतसर लग्न करून थिएटरचा उंबरा ओलांडून तुमच्या कडे येते. तिला नांदवा ही विनंती.🙏🏻
माझं नातं audiance म्हणून मुलीच्या सासर कडूनही आहे, आणि एक कलाकार म्हणून माहेर कडूनही आहे. म्हणून हक्काने सांगतो, मुलीवर छान संस्कार झाले आहेत. आता तुमच्या शुभ-आशीर्वादांची गरज आहे .
बाकी कार्यसिद्धीस श्री आणि “AVK” समर्थ आहेत .
आमच्या दादाच्या सिनेमाला यायचं हां !
तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, संजय नार्वेकर, नागेश भोसले, आनंद इंगळे, विशाखा सुभेदार, सोनाली खरे-बीजय आनंद, वनिता खरात, मीरा जगन्नाथ, जयवंत वाडकर, इशान खोपकर, समस्त “येरे येरे पैसा-३” परिवार आपलं स्वागत करीत आहेत!

कुशलच्या अतरंगी पोस्टवर त्याच्या सहकलाकारांनी कमेंट्स पण केल्या आहेत. सिद्धार्थ जाधव त्याच्या कमेंटमध्ये म्हणतो, ‘माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे भावा' . तेजस्विनी पंडित म्हणते, ‘ किती छान लिहितोस यार. खूप खूप प्रेम.’ तर एक युजर मजेशीर कमेंट करताना म्हणतो, ‘मध्यस्थी माणूस... लग्न टिकलं तर ठीके नाहीतर ह्या व्यक्तीला पकडा…’

दिग्दर्शक संजय जाधव यांनी 2018 मध्ये येरे येरे पैसा सिरिजमधील पहिला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. तर या सिनेमाचा दूसरा भाग 2019 मध्ये रिलीज झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news