Sai Lokur 
मनोरंजन

Sai Lokur : फू बाई फू, थकलीस का गं सई बाई तू…; सईनं धरला फुगडीचा फेर (व्हिडिओ)

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'बिग बॉस मराठी' फेम आणि मराठी अभिनेत्री सई लोकूर ( Sai Lokur ) नुकतेच बालीतील व्हेकेशन एन्जॉय करून घरी परतली आहे. सध्या सईची पहिली मंगळागौर मोठ्या धुमधड्याक्यात साजरी करण्यात येत आहे. याच दरम्यान सईचे नवीन पारंपरिक पद्धतीच्या फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहे. आता तिच्या मंगळागौरीच्या फुगड्या खेळतानाचा व्हिडिओ चर्चेत आला आहे.

अभिनेत्री सई लोकूरच्या ( Sai Lokur ) इन्स्टाग्रामवर पहिली मंगळागौरीचे फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. या व्हिडिओत सईने 'फू बाई फू फूगडी फू, थकलीस का गं सई बाई तू…' आणि 'खेळू झिम्मा, खेळू झिम्मा' या धमाकेदार गाण्यावर ताल घरताना दिसली आहे. यावेळी लाजणे, मुरडणे, हसण्यासोबत तिच्या गोल फेरा धरणे, फुगडी घालणे, लाडणे- लाडणे खेळणे, सुप नाचवणे या कलागुणांना वाव मिळाला आहे. सईनं ग्रीन रंगाच्या नऊसाडीसोबत गुलाबी रंगाच्या ब्लॉऊज परिधान केलाय. या मराठमोळ्या लूकमध्ये सईचं सौदर्य अधिक खूललं आहे. केसांचा अंबाडा, साजेशीर दागिने, कपाळावर चंद्रकोर, कमरपट्टा, केसांत गजरा, हातात हिरव्या बांगड्या, मेंहदी, नाकात नथ, पायात कोल्हापूरी चप्पल आणि मेकअपने तिच्या सौंदर्य भर घातली आहे. तर काही फोटोत सई तिच्या कुटुंबीयांसोबत तर भगवान शंकरांची पूजा करताना दिसतेय.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'My first ever MANGALAGAUR ? And what a beautiful experience it was!'. असे लिहिले आहे. या कार्यक्रमात सईची खास मैत्रीण मेघा धाडे दिसत आहे. सईचं व्हिडिओ आणि फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. हा कार्यक्रम एका मोठ्या हॉलमध्ये असून तेथे लायटिंगची सजावट देण्याचेदेखील दिसतेय. तर सईसोबत काही महिलादेखील यात सहभागी झाल्या आहेत.

हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेन्टचा पाऊस पाडला आहे. यात एका युजर्सने 'सुंदर सई ❤️', 'मस्त फुगडी', 'Looking very pretty ❤', 'Ufffffffff ???✨? So pretty decent… beauty…', 'Amazing ❤️', 'Nice ?', 'Beautiful ?', 'Wonderful ❤️', 'Khup chaan friendship ahe tumchi kisi ki najar na lage', 'Stunning❤️', साडीमध्ये आतिशय सुंदर ❤?', 'अप्सरा ❤️?','Nice look ❤️'यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. याशिवाय काही चाहत्यांनी हार्ट, हास्य आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस बॉक्स भरला आहे. या व्हिडिओला भूषण प्रधानसह आतापर्यत जवळपास ७ हजांराहून अधिक जणांनी लाईक्स केले आहेत. सई लोकूर नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. याआधीही तिने बाली येथील व्हेकेशनचे फोटो शेअर केले होते.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT