मुंबई; पुढारी ऑनलाईन: 'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू (rinku rajguru) नेहमी आपले हटके फोटो शेअर करून सोशल मीडियावर सक्रीय असते. सध्या रिंकूचा पारंपरिक साडीतील लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
रिंकूने (rinku rajguru) तिच्या इंस्टाग्रामवर नुकतेच काही हटके पारंपरिक साडीतील लूक शेअर केला आहे. या फोटोत तिने गुलाबी रंगाच्या साडीसोबत हिरव्या रंगाचे ब्लाऊज घातले आहे. यात रिंकूचे सौदर्य खुलून दिसत आहे.
याशिवाय विजयादशमीच्या शुभेच्छा देत आणखी एक रिकूने साडीतील फोटोशूट केलं आहे. यात तिने पिवळ्या रंगाची साडीसोबत लाल रंगाचे ब्लाऊज घातले आहे. भरजरी साडीसोबत रिंकूने केसांत माळलेल्या गजऱ्याने चाहत्यांना घायाळ केलं आहे. या फोंटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहेत.
हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच अनेक चाहत्यांनी कॅमेंन्टसचा पाऊस पडत आहे. यात एका युजर्सने 'खरचं तुझ्या सारखी सुंदर कोणी नाही.' तर दुसऱ्या एकाने 'खुपच तुझे डोळे आहेत.' असे म्हटले आहे. याशिवाय तिसऱ्या एकाने 'आई शपथ. साडीवरती परीच दिसतेयस.' अशी कॅप्शन दिली आहे. यासोबत चाहत्यांनी प्रेमाचा आणि फायरचा ईमोजीदेखील शेअर केला आहेत.
याआधी रिंकूने पांढऱ्या आणि खाकी रंगाच्या डेनिममध्ये दिसली होती. या फोटोंवर कॉमेंन्टस करताना चाहत्यांनी तिला हॉलिवूडमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. याशिवाय तिने कमी कालावधीच वजनदेखील कमी केले होते. सैराट' या चित्रपटातून अवघ्या महाराष्ट्राला तिने याड लावले होतं. या फोटोला आतापर्यंत ३१ हजाराहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.
रिंकू आगामी 'छूमंतर' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रिंकू राजगुरुसोबत प्रार्थना बेहरे, सुक्रत जोशी, ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी हे करत आहेत. यासोबत ती आगामी हिंदी 'झुंड' या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि आकाश ठोसरसोबत दिसणार आहे.
याशिवाय रिंकू राजगुरुच्या आगामी '२०० हल्ला हो' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये रिंकूने दोनशे महिलांना एकत्र आणले आहे. ती त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवते असे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाची चाहत्यांची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे.
हेही वाचलंत का?