Mouni Roy 
मनोरंजन

Mouni Roy : मौनी घनदाट जंगलात एकदम हॉट (video)

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यत प्रवास करणारी अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy ) नेहमी सक्रिय असते. ती नेहमी हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या मौनीच्या आणखी एका हॉट फोटोशूटने सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.

अभिनेत्री मौनी रॉयने (Mouni Roy ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर पिंक रंगाच्या हाई थाई स्लिट ड्रेसमधील काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत मौनी घनदाट जंगलात आब्यांच्या झाडाजवळ येवून पोझ देताना दिसतेय. मोकळ्या केसांच्या स्टाईल, मेकअप आणि हाय हिल्सने तिच्या सौंदर्यात भर घातली आहे.

शेअर झालेल्या व्हिडिओला तिने 'Heads a jungle, Beautiful & wild'. असा तर फोटोला 'Feeling like Jane Porter ??‍♀️??‍♀️'. असे कॅप्शन दिली आहे. या फोटोत मौनी खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. मौनीने फोटोला पोझ देताना कधी तिचे हात डोक्यावर ठेवले आहेत तर कधी ती खुर्चीत बसलेली एकदम हॉट दिसतेय. हा फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

हा व्हिडिओ शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेन्टस केल्या हेत. यात एका युजर्सने 'Look soo hot???', 'My inspiration for fitness ??', 'Beautiful ❤️❤️????', 'Beutiful as always ❤️', 'Khubsuraaat ?❤️', 'Hotttyy forever ??', 'Nagin❤️',' Hotttteeeyyyyy??', 'Uff?', 'Fabulous reel❤️', 'Nice looking'. यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत. याशिवाय काही चाहत्यांनी हार्ट आणि पायरचे ईमोजींनी कॉमेन्टस बॉक्स भरलेला आहे.

मौनी रॉय नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते. या व्हिडिओला आतापर्यत २ दोन लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहेत. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास मौनी लवकरच अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT