poonam pandey entry lavkush ramleela
मुंबई- दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या लवकुश रामलीला कार्यक्रमात अभिनेत्री पूनम पांडे हिच्या एन्ट्रीमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेशी जोडलेल्या या ऐतिहासिक कार्यक्रमात तिच्या सहभागामुळे विश्व हिंदू परिषदेसह काही धार्मिक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पूनम पांडे ही आपल्या बोल्ड प्रतिमा आणि वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा चर्चेत राहिली आहे. त्यामुळे रामायणासारख्या धार्मिक कथानकावर आधारित असलेल्या रामलीलेत तिचा सहभाग अयोग्य असल्याचा दावा विश्व हिंदू परिषदेने केला आहे. त्यांनी आयोजकांवर टीका करत म्हटले आहे की, "धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये अशा व्यक्तींना स्थान देणे म्हणजे श्रद्धा आणि परंपरांचा अपमान आहे."
मॉडेल - अभिनेत्री पूनम पांडेला लवकुश रामलीलामध्ये मंदोदरीची भूमिका साकारण्यावर विहिपने आक्षेप घेतला आहे. रामलीला कमिटीला विनंती केली आहे की, या प्रकरणी पुनर्विचार करावे. विहिपच्या दिल्ली प्रांताचे मंत्री सुरेंद्र कुमार गुप्ता यांनी सांगितले की, रामलीला केवळ एक नाट्य-प्रस्तुती नाही तर भारतीय समाज आणि संस्कारांचा एक जीवंत भाग आहे. संघटनेने विनंती केली आहे की, रामायण-आधारित प्रस्तुतींमध्ये पात्रांची निवड केवळ अभिनय क्षमतेवर नाही तर सांस्कृतिक उपयुक्तता आणि भाविकांच्या भावनां लक्षात घेता केली जावी.
विहिपची मागणी आहे की, निर्णयावर पुनर्विचार केल्यास हे होऊ शकतो. आमचे म्हमणे आहे की, लोकांना सुधारण्याची संधी द्यायला हवी.
दरम्यान, पूनम पांडेच्या निवडीमुळे साधु-संतांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले- "रामलीला समितींना आमची विनंती आहे की, त्यांनी सभ्यता राखावी. रामलीलाची प्रतिष्ठा कलंकित होऊ नये म्हणून कलाकारांची पार्श्वभूमी आणि वर्तन विचारात घेतले पाहिजे. चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून विचारपूर्वक पावले उचलणे महत्त्वाचे आहे."