मनोरंजन

Manushi Chhillar : मानुषी छिल्लरचा नारंगी बिकिनीत स्विमिंग पूलवर जलवा

अनुराधा कोरवी

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन: २०१७ मध्ये मिस वर्ल्डचा किताब पटकावणारी मानुषी छिल्लर ( Manushi Chhillar ) लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. आगामी 'पृथ्वीराज' या चित्रपटात बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारसोबत मानुषी ( Manushi Chhillar ) 'संयोगिता' च्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीच तिच्या नारंगी रंगाच्या बिकिनीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

नुकतेच मानुषी छिल्लरने आपल्या इंन्स्टाग्रामवर नारंगी रंगाच्या बिकिनीतील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंत ती स्विमिंग पूलच्या जवळ बसलेली असून खूपच ग्लॅंमरस दिसत आहे. या फोटोंमधून ती परफेक्ट फिगर फ्लॉंट करताना दिसली आहे. हे फोटो शेअर करताना मानुषीने प्रेमाचा दोन ईमोजी शेअर केले आहेत.

हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांचा कॉमेंन्टसचा पाऊस पडत आहे. यात एकाने तिच्या हॉट लूकचे कौतुक केले आहे. तर आणखी एकाने तुझ्या सौंदर्याचे गुपित काय आहे? अशा प्रश्न विचारला आहे. याशिवाय आणखी एकाने 'सौंदर्याची व्याख्या तुम्हीच असावी', असे म्‍हटलं आहे. 'ग्लॅमरस', 'हॉट' आणि 'खूपच सुंदर' अशा अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मानुषी छिल्लर नेहमी सोशल मीडियावर आपले व्हिडिओ आणि हॉट फोटो शेअर करत असते. अभिनेता अक्षय कुमारसोबत मानुषीचा आगामी 'पृथ्वीराज' हा चित्रपट लवकरच येत आहे.

मानुषी छिल्लर पेशाने डॉक्टर होती; पण २०१७ मध्ये फेमिना मिस वर्ल्डचा पुरस्कार मिळाल्यानंतर तिचे नशीब पालटले. मध्यंतरी मानुषी बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याचे वृत्त समोर आले होते.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT