delhi high court orders actor rajpal yadav to surrender instagram
मनोरंजन

Rajpal Yadav | चेक बाऊन्स प्रकरणी राजपाल यादवच्या अडचणीत वाढ, कोर्टाने सरेंडर करण्याचे दिले आदेश

Rajpal Yadav | चेक बाऊन्स प्रकरणी राजपाल यादवच्या अडचणीत वाढ, कोर्टाने सरेंडर करण्याचे दिले आदेश

स्वालिया न. शिकलगार

चेक बाऊन्स प्रकरणात अभिनेता राजपाल यादव यांना दिल्ली उच्च न्यायालयाने ४ फेब्रुवारी दुपारी ४ वाजेपर्यंत सरेंडर करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने वारंवार दिलेल्या आश्वासनांचे उल्लंघन गंभीर आणि निंदनीय असल्याचं स्पष्ट करत, आता कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचं सांगितलं आहे.

Rajpal Yadav cheque bounce case

चेक बाऊन्स प्रकरणी अभिनेता राजपाल यादवच्या अडचणी वाढल्या आहेत. दिल्ली हायकोर्टाने त्यांना ४ फेब्रुवारी पर्यंत सरेंडर करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्ली हायकोर्टाने अभिनेता राजपाल यादव यांना ४ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत संबंधित तुरुंग अधीक्षकांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले.

कोर्टाने म्हटले की, चेक बाउन्स प्रकरणात पैसे देण्याबाबत वारंवार दिलेल्या आश्वासनांचे उल्लंघन करणे अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह आहे.

नेमकं प्रकरण काय?

२०१० साली राजपालने इंदौरच्या सुरेंद्र सिंह नावाच्या व्यक्तीकडून ५ कोटी रूपयांचे कर्ज घेतले होते. मात्र राजपालने दिलेल्या मुदतीत पैसे परत न दिल्याने सुरेंद्र यांनी फॉलोअप घेतला. त्यामुळे २०१५ साली राजपालने त्यांना दिलेला एका बँकेचा चेक सुद्धा बाऊन्स झाला होता. त्यामुळे सुरेंद्र यांनी वकिलांकडून त्याला नोटीस पाठवली. तरी देखील त्याने पैसे दिले नाहीत. त्यामुळे सुरेंद्र सिंह यांनी येथील कोर्टात खटला दाखल केला.

न्यायाधीशांनी सुनावणीवेळी सांगितले की, राजपाल यादवला अनेक संधी देण्यात आल्या होत्या. पण, त्याने कर्ज फेडले नाही. त्याने कोर्टाचा विश्वास भंग केला शिवाय न्यायालयीन प्रक्रियेकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे राजपाल यादवला ट्रायल कोर्टाने दिलेली शिक्षा पूर्ण करावी लागणार आहे.

२ फेब्रुवारी, २०२६ रोजी झालेल्या सुनावणीवेळी कोर्टाने सांगितले की, राजपाल यादव यांचे वर्तन पूर्णपणे अयोग्य आहे. सातत्याने संधी आणि अभिनेत्याच्या बाजूने विचार करूनही तक्रारदार कंपनीला त्याने पैसे दिलेले नाहीत. यावेळी राजपाल यादवच्या वकिलाने कोर्टाकडून दिलासा मागितला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT