मनोरंजन

Rajashree Landge : गंगी इतकी कशी बदललीस तू?

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन: मराठी अभिनेता मकरंद अनासपुरे याचा 'गाढवाचं लग्न' हा चित्रपट आज ही चाहत्यांना खळखळून हासायला लावतो. या चित्रपटात मकरंद अनासपुरेने सावळ्या कुंभाराची तर त्याची पत्नी गंगीची भूमिका अभिनेत्री राजश्री लांडगे (Rajashree Landge) हिने साकारली आहे. या चित्रपटातील तिचा 'हे तर असं झालं की, रोज घालतय शिव्या आणि एकादशीला गातंय ओव्या' हा डॉयलॉग खूपच फेमस झाला हाेता. या चित्रपटात अगदी साधी सरळ दिसणारी गंगी सध्या मात्र, खूपच ग्लॅमरस दिसत आहे. राजश्री लांडगे (Rajashree Landge) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

मकरंद अनासपुरे आणि राजश्री लांडगे यांचा 'गाढवाचं लग्न' हा चित्रपट छोट्या पडद्यावर लागला की, चाहते आजही आपल्या कुटुंबासोबत चित्रपट पाहण्याचा आनंदासोबत खळखळून हसताना दिसतात. या चित्रपटातील राजश्री लांडगे म्हणजे, गंगीची गावरान भूमिका चाहत्यांच्या आजही लक्षात राहिली. परंतु, या चित्रपटातील गंगी काळानुसार बदलेली आहे.

राजश्री सोशल मीडियावर नेहमी आपले हॉट फोटो शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. शेअर केलेल्या फोटोत ती ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे. कधीतर ती साडीत किंवा कधीतर ती सुंदर ड्रेसमध्ये दिसते. याशिवाय तिला निसर्गरम्‍य ठिकाणी फिरण्याचा आणि कार चालवण्‍यास आवडते. यासोबत तिने काही फोटोत डोळ्यावर एक गॉगल परिधान करत हटके पोझ दिली आहे.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी अनेक कॉमेंन्टस दिल्या आहे. या फोटोंनी पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. 'गाढवाचं लग्न' या मराठी चित्रपटानंतर फारसे तिला कोणत्याही दुसऱ्या चित्रपटात पाहिले गेले नाही, परंतु, तिचा या चित्रपटातील भूमिकेने आज चाहत्याच्या मनात घर गेल्याचे दिसते. या चित्रपटातून पहिल्यादा तिने पदार्पण केले होते.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT