चायनीज अभिनेता, गायक यु मेंगलोंग Pudhari
मनोरंजन

Actor Death: वयाच्या 37 व्या वर्षी अभिनेत्याचा इमारतीवरुन पडून मृत्यू

यु मेंगलोंगच्या अचानक जाण्याने मनोरंजनसृष्टि आणि त्याच्या फॅंन्सवर दुखाचा डोंगर कोसळला

अमृता चौगुले

चायनीज अभिनेता, गायक यु मेंगलोंग याचा मृत्यू झाला आहे. बीजिंगमधील एका इमारतीवरुन पडून त्याचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. कोरियाबुने त्याच्या एजन्सीच्या हवाल्याने या बातमीची पुष्टी केली आहे. यु मेंगलोंगच्या अचानक जाण्याने मनोरंजनसृष्टि आणि त्याच्या फॅंन्सवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. (Latest Entertainment News)

त्याच्या मॅनेजमेंट टीमने पोस्ट केलेल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, अतीव दुखाने आम्ही ही घोषणा करत आहोत की आमचे प्रिय मेंगलोंग याचे निधन झाले आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास केला आहे. यामध्ये काहीही संशयास्पद आढळून आले आहे. त्याच्या आत्म्याला शांती मिळो. त्याच्या जवळच्याना यातून बाहेर पडण्याची शक्ति मिळो.’

नेमका काय घडले होते त्या रात्री?

वीबो या सोशल मीडिया अकाऊंटवरुन सर्वप्रथम युच्या मृत्यूची बातमी समोर आली. 9 सप्टेंबरला रात्री यु याने मित्रांसोबत जेवण केले. जवळपास दोन वाजता तो झोपण्यासाठी गेला, दार आतून लावून घेतले.

सकाळी मित्र परत जायला निघाले तेव्हा यु तिथे दिसले नाहीत. खाली जाऊन पाहिले असता यु मृत्यूमुखी पडल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांना बोलावले गेले.

पाचव्या मजल्याची तुटलेली खिडकी

या पोस्टमध्ये दावा केला गेला होता की पाचव्या मजल्यावरची खिडकी तुटलेली होती. यातूनच पडून युचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. युच्या मृत्यूने अनेकांना धक्का बसला आहे. अवघ्या 37 व्या वर्षी युने जगाचा निरोप घेतल्याचा अनेकांना धक्का बसला आहे.

पाचव्या मजल्याची तुटलेली खिडकी

या पोस्टमध्ये दावा केला गेला होता की पाचव्या मजल्यावरची खिडकी तुटलेली होती. यातूनच पडून युचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. युच्या मृत्यूने अनेकांना धक्का बसला आहे. अवघ्या 37 व्या वर्षी युने जगाचा निरोप घेतल्याचा अनेकांना धक्का बसला आहे.

असे होते त्याचे करियर

यु मेंगलोंगने 2007 मध्ये रिअलिटी शो 'माय शो, माय स्टाइल' ने आपल्या करियरची सुरुवात केली होती. पण त्याला खरी लोकप्रियता मिळाली ती गो प्रिन्सेस गो आणि इटरनल लव्ह या टेलिव्हिजन सिरिजने. गायक म्हणूनही युची लोकप्रियता जास्त होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT