Actor Ashish Kapoor granted Bail
मुंबई : टीव्ही मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम आशिष कपूरला दिल्लीच्या तिस हजारी कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. यासाठी कोर्टाने त्याच्यासमोर काही अटी ठेल्या आहेत, ज्याचे पालन त्याला करावे लागणार आहे. टीव्ही अभिनेता आशीष कपूर मागील महिन्यात दिल्लीमध्ये एका हाऊस पार्टीच्यावेळी एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर ३ सप्टेंबर, २०२५ रोजी अटक केली होती.
'सरस्वतीचंद्र', 'देखा एक ख्वाब' आणि 'मोल्की-रिश्तों की अग्निपरीक्षा' यासारख्या मालिकांमध्ये आशीषने अभिनय साकारला आहे. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, शुक्रवार, १० सप्टेंबर, २०२५ रोजी कोर्टाने सशर्त जामीन दिला आहे.
'अशाप्रकारे वरील टिप्पण्या आणि चर्चा, कोर्टाच्या नोटीसवर आणल्या गेलेल्या वस्तुस्थिती आणि परिस्थिती, विशेषत: दिल्लीचा कायमस्वरुपी रहिवासी आणि त्याच्यावर कुठलाही डाग नसल्याची पार्श्वभूमी पाहता यापुढे चौकशीसाठी आरोपीची आवश्यकता नाही, जामीन याचिका मजूत आहे आणि त्यानुसार ते स्वीकारले जाते.'
पोलिसांनी आशीषला पाच दिवस ताब्यात देण्याची मागणी केली होती. परंतु, मध्य जिल्ह्याचे प्रथम श्रेणी न्यायालयीन दंडाधिकाऱ्यांनी त्याला केवळ चार दिवस परवानगी दिली. तथापि, त्याला फक्त तीन दिवसांतच कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने तपासणीतील त्रुटींकडे लक्ष वेधले.
कोर्टाने म्हटले आहे की, 'खासगी कोठडी (पीसी) रिमांड घेतल्यानंतरही मोबाईल फोन ताब्यात घेण्यासाठी कोणतेही गंभीर प्रयत्न केले गेले नाहीत. कायद्यानुसार कोणताही शोध घेण्यात आला नाही. संशयित आरोपीने चौकशीत सहकार्य केले नाही, असे रेकॉर्डमध्ये काहीही नाही.'
आशीषला १ लाख रुपयांच्या जामीन बाँडवर स्वाक्षरी करण्यास सांगितले गेले आहे. त्याला नेहमीच त्यांच्या मोबाईल फोनचे लोकेशन चालू ठेवण्यास सांगितले गेले आहे. आशिषने अद्याप या विषयावर कोणतेही अधिकृत विधान अथवा प्रतिक्रिया दिलेली नाही.
आपल्या जबाबात पीडिताने म्हटले होते की, दारु प्यायल्यानंतर तिला अजिबात चांगले वाटत नव्हते. तिने आरोप केला की, ते लोक तिला एका रुग्णालयात घेऊन गेले आणि सामूहिक बलात्कार केला आणि या घटनेचे रेकॉर्डिंग करत तिला मारहाण देखील करण्यात आली. महिलाने दावा केला की, आरोपींनी पोलिसांना सांगितल्यास तिला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देखीस दिली होती. पीडितेच्या तक्रारीनंतर ११ ऑगस्ट रोजी सिव्हिल लाईस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.